Mangal Prabhat Lodha : लव्ह जिहादची 1 लाख प्रकरणं, सरकार चालू अधिवेशनात विधेयक मांडणार
मुंबई : लव्ह जिहादबाबत (love jihad) महिला आणि बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी काल विधान सभेत अत्यंत धक्कादायक माहिती दिली. महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक लव्ह जिहादची प्रकरणं असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात श्रध्दा वालकर (Shraddha Walker) सारखी प्रकरणं थांबवण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह कमिटी (Intercaste and Interfaith Marriage Committee) स्थापन करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्राचे महिला धोरण राज्यविधीमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) मांडले जाईल, अशी माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
Jalgaon : एच3एन2ने नागरिक त्रस्त, वायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव
मंगल प्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक लव्ह जिहादचे प्रकरणं झाली आहेत. त्यामुळे समाज व्यथित झालेला आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह कमिटीचा जीआर कोणाच्याही धार्मिक किंवा व्यक्तीगत जीवनात हस्तक्षेप करीत नाही. परंतु राज्यात पुन्हा श्रध्दा वालकर सारखी प्रकरणं होऊ नयेत ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे मंगल प्रभात लोढा यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले.
डिसेंबर 2022 मध्ये राज्य सरकारने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांची नोंद ठेवणारी समिती स्थापन केली आहे. ही 13 सदस्यांची समिती असून त्यामध्ये महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा या समितीचे अध्यक्ष आहेत. नोंदणीकृत व अनोंदणीकृत विवाह व धार्मिक स्थळी झालेल्या विवाह, आंतरजातीय, आंतरधर्मीय, पळून केलेले विवाह यांची माहिती घेण्याचे काम ही समिती करणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती.