Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यंदा काँग्रेस (Congress) आणि भाजपात (BJP) लढत होईल असे मानले जात आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी भाजपने खास रणनिती तयार केली आहे. निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भाजपचे मुख्य प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांच्या किमान 20 रॅली होतील असे नियोजन करण्यात आले आहे.
विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात 6 ते 8 मे पर्यंत मोदी राज्यात तळ ठोकून राहतील अशी शक्यता आहे. काँग्रेस आणि जनता जेडीएसच्या बालेकिल्ल्यांवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
Karnataka Elections : जिथून मोदींना चिथावले तिथेच फोडणार प्रचाराचा नारळ; राहुल गांधींचा भन्नाट प्लॅन
राज्यात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण तयार करण्यात विरोधी पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे विरोधी वातावरणाचा फटका बसू नये यासाठी पक्षाची भिस्त मोदी यांच्यावर आहे. केवळ मोदींची जादूच विजय मिळवून देऊ शकते असे व्यवस्थापकांनाही वाटत आहे. त्यांच्या मते प्रत्येक ठिकाणी मोदींच्या किमान तीन सभा घेण्याची योजना आहे. राज्याची ज्या सहा भागात विभागणी करण्यात आली आहे.
यापैकी हैदराबाद-कर्नाटक (सीमावर्ती आंध्र प्रदेश) सारख्या काही भागात ज्यात सुमारे 40 विधानसभेच्या जागा आहेत तेथे पंतप्रधानांच्या अधिक रॅली होऊ शकतात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या भागातील सर्वात प्रभावशाली नेते असल्याने गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला येथून फक्त 15 जागा मिळाल्या होत्या.
Rahul Gandhi ना घर खाली करायला सांगितले… अन् काँग्रेसने सुरु केली ‘मेरा घर आपका घर’ मोहिम
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारवर काही भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने पक्षाच्या राज्य कार्यकर्त्यांच्या नावाचा फारसा उल्लेख न करता मोदी थेट लोकांशी संपर्क साधतात. स्थानिक समस्या आणि स्थानिक मुद्देच ते अधोरेखित करतील यावर पक्षाच्या प्रचाराचा भर असेल.
मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी मोदींनी अलीकडेच हुबळी, मंड्या इत्यादी ठिकाणी घेतलेल्या सात रॅलींमध्ये हे आधीच दिसून आले होते. प्रचारा दरम्यान ते कोणत्याही एका नेत्याचे समर्थन करतानाही दिसणार नाहीत अशी शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘त्या’ सर्व्हेमुळे वाढली धास्ती
कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लागलीच एक सर्व्हे आला होता. त्यामध्ये भाजपचा पराभव होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तसेही सध्याच्या भाजप सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहेच. त्यामुळे सावध होत पक्षनेतृत्वाने प्लॅनिंग सुरू केली. पंतप्रधान मोदीच विजय मिळवून देऊ शकतात असे गृहीत धरत त्यांचा ताबडतोड रॅलींचे नियोजन करण्यात आले आहे. आता यानंतर मोदींची जादू चालणार का, याचे उत्तर निवडणूक निकालानंरतच मिळेल.