Download App

Bharat Jodo Yatra 2.0 : राहुल गांधीच्या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार, असा असेल संभावित मार्ग

  • Written By: Last Updated:

कन्याकुमारी ते काश्मीर असा मोठा टप्पा पार करून भारत जोडो यात्रा संपल्यानंतर कॉंग्रेस आता ‘भारत जोडो यात्रा २.०’ सुरु करण्याच्या विचारात आहे. यावेळी देशाच्या पूर्वेकडील भागापासून पश्चिम भागापर्यंत प्रवास करण्याचा विचार केला जात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासिघाट येथून गुजरातमधील पोरबंदर पर्यंत हि यात्रा असेल अशी माहिती काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे.

रायपूर येथे सुरु असलेल्या काँग्रेस अधिवेशात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणात भारत जोडो यात्रा पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले होते. आपल्या भाषणात अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना म्हणाले होते की ही ‘तपस्या’ पुढे नेण्यासाठी एक कार्यक्रम तयार करावा, ज्यामध्ये सर्वजण सहभागी होण्यासाठी तयार आहेत. भारत जोडो यात्रेचा राहुल गांधी यांनी तपस्या असा उल्लेख केला होता.

हेही वाचा : ठाकरेंचा पक्ष सेक्युलर आहे का? ओवेसींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

रायपूर अधिवेशनाच्या शेवटी माध्यमांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, कदाचित यावेळी अरुणाचलमधील पासिघाटपासून हा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे आणि तो पोरबंदरमध्ये संपेल. ते पुढे म्हणाले की, “पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवासाचे स्वरूप दक्षिणेकडून उत्तरेकडील प्रवासापेक्षा वेगळे आहे. कदाचित हा प्रवास अशा मोठ्या पातळीवर नसेल.”

पुढील आठवड्यात तयारी

कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम म्हणाले की, पुढील काही आठवड्यांत सर्व काही निश्चित केले जाईल. ईशान्येकडील भौगोलिक आणि हवामान-संबंधित परिस्थिती लक्षात घेता वेगवेगळी व्यवस्था प्रवासासाठी वापरली जाऊ शकते. शिवाय आधीच्या प्रमाणे यामध्ये प्रवासी संख्याही कमी असेल.

 

Tags

follow us