Bhiwani News: राजस्थानमधील डिग, अलवर आणि भरतपूर जिल्ह्यातील काही लोक व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल ( WhatsApp Video call) करून नग्न व्हिडिओ बनवत. त्यानंतर नंतर गुन्हे शाखा दिल्लीत इन्स्पेक्टर आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून पीडितांकडून पैसे उकळायचे. या टोळीने 31 वेगवेगळ्या राज्यातील 752 लोकांना टार्गेट करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.
काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 228 लोक या टोळीला बळी पडले. तर हरियाणात 41 लोक त्यांचे शिकार ठरले. भिवानी येथील एका वध्दाची या टोळीनं फसवूनक केल्यानंतर संबंधित वृद्धाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर भिवानी सायबर स्टेशनच्या पोलिसांनी त्या टोळीच्या राजस्थानमधूनच मुसक्या आवलळ्या. टोळीतील आठ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं. त्यांच्याकडून वृद्धांची फसवणूक केलेली 27 लाखांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, जातीवाचक शिवीगाळ केल्यानं ॲट्रॉसिटी दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, भिवानी पोलिसांनी पकडलेल्या आठ जणांमध्ये राजस्थानमधील डीग जिल्ह्यातील खेडला नौआबाद गावचे रहिवासी पिता-पुत्र जफरुद्दीन आणि नसीर, दोन भाऊ जाफर आणि जिलसाद, अलवरच्या हसनपूर माफी वासीचा रहिवाशी इक्बाल, याशिवाय भारतपुरच्या जुरेहडा गावाच चंदू आणि आसिर, डीग जिल्ह्यातील बासोली गावचा अकरम यांचा समावेश आहे. यापैकी कुणी टार्गेटला फोन करायचा, तर कुणी नग्न व्हिडिओ बनवायचे. त्यापैकी एकजण आपण गुन्हे शाखा आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून पीडितांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. पोलिसांनी सांगितले की, ते फ्रेंडशिप ॲपसारख्या विविध ॲप्सवरून लोकांचे फोन नंबर मिळवत.
दरम्यान, सेक्टर-13, भिवानी येथील राहणाऱ्या एका वृद्धाला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल आला होता. हा कॉल घेतल्यावर एका मुलीने आक्षेपार्ह कृत्य सुरू केलं. या न्यूड कॉलद्वारे वृद्धाच्या चेहऱ्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून, यूट्यूबवरून अश्लील व्हिडिओ डिलीट करून देण्याच्या नावाखाली आणि गुन्हे शाखा दिल्लीतील इन्स्पेक्टर आणि सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी करून 36 लाख 84 हजार रुपये उकळले.
त्यानंतरही 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. सायबर क्राईम स्टेशन प्रभारी विकास यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने राजस्थानमधून आठ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 27 लाख रुपये जप्त करण्यात आले.
राज्यनिहाय तक्रारी
उत्तर प्रदेश 228
राजस्थान 104
तेलंगणा 58
दिल्ली 41
हरियाणा 41
तामिळनाडू 39
महाराष्ट्र 37
बिहार 32
गुजरात 25
मध्य प्रदेश 20
पश्चिम बंगाल 20
कर्नाटक 18
उत्तराखंड 15
केरळ 11
छत्तीसगड 09
ओडिशा 08
झारखंड ०७
पंजाब 07
आंध्र प्रदेश 06
आसाम 06
चंदीगड ०५
पाँडिचेरी, अरुणाचल प्रदेश, मेघालय ०२-०२