Hathras stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत नुकतचं एकजणाला अटक करण्यात आली आहे. आता या सत्संगातील प्रमुख वक्ता भोले बाबाने (Bhole Baba) याप्रकरणावर प्रथमच भाष्य केलं आहे. (Hathras stampede) २ जुलैच्या घटनेनंतर मला खूप दु:ख झालं. देव आपल्याला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. मला विश्वास आहे की अराजकता निर्माण करणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही. माझे वकील एपी सिंग यांच्या माध्यमातून मी कत्संगाच्या आयोजकांच्या समिती सदस्यांना शोकग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आयुष्यभर मदत करण्याची विनंती केली आहे अशी प्रतिक्रिया या भोले बाबाने दिली आहे.
समितीच्या सदस्यांना अटक अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट; तीन तास बंद दाराआड खलबत
हाथरस जिल्ह्यातील फुलराई गावात त्याच्या सत्संगात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी अधिकारी सूरजपाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा याला शोधत असताना, त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्लीत आत्मसमर्पण केल्यानंतर ताब्यात घेतलं आहे, असा दावा त्याच्या वकिलाने शुक्रवारी रात्री केला. गुरुवारपर्यंत या प्रकरणी भोलेबाबाच्या सत्संगाच्या आयोजन समितीच्या सदस्य असलेल्या दोन महिला स्वयंसेविकांसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. हातरस येथील सिकंदरराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक लाख रुपयांचं बक्षीस मोठी बातमी! हाथरस सत्संग प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक; दुर्घटनेत १२१ जणांनी गमावले प्राण
हाथरस दुर्घटनेनंतर भोले बाबा बेपत्ता होता. या भीषण अपघाताच्या ४ दिवसांनंतर सूरज पाल पहिल्यांदाच मीडियासमोर आला आहे. मात्र, अपघातानंतर सुमारे 30 तासांनी बाबाचे लेखी निवेदन समोर आले होतं. ज्यात त्याने मृतांप्रती शोक व्यक्त केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला शुक्रवारी रात्री उशिरा यूपी एसटीएफने अटक केली. मधुकरवर एक लाख रुपयांचे बक्षीस होतं. अपघातानंतर मधुकर फरार होता. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या एसआयटीने आतापर्यंत 90 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
#WATCH | Hathras Stampede Accident | Mainpuri, UP: In a video statement, Surajpal also known as 'Bhole Baba' says, "… I am deeply saddened after the incident of July 2. May God give us the strength to bear this pain. Please keep faith in the government and the administration. I… pic.twitter.com/7HSrK2WNEM
— ANI (@ANI) July 6, 2024