अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट; तीन तास बंद दाराआड खलबत
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी गेली अनेक दिवसांपासून अमरण उपोषण करणारे (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील आता मराठवाड्यात जनजागृती शांतता दौरा करणार आहेत. त्याची सुरूवात आजपासून हिंगोरीतून होणार आहे. दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavhan) आणि शिवसेना (शिंदे गट)छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी काल रात्री उशिरा जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. ही बैठक तब्बल तीन तास चालल्याची चर्चा आहे.
मराठा आरक्षण, आमच्या व्याख्या प्रमाणे सगे सोयरे कायद्यांची अंमलबजावणी करणे, हैद्राबादसह विविध संस्थाचे गॅजेट स्विकारणे, जात प्रमाणपत्र वाटप चालू करणे, गुन्हे मागं घेणे, मुलींना मोफत शिक्षण लागु करणं, मुलींची फी माफ करणं व समाजाला त्रास देणं थांबवणं आदी मागणीसाठी मनोज जरांगे मराठवाड्यात (आजपासून) मराठा आरक्षण जनजागृती शांतता राअलीची सुरवात हिंगोली जिल्ह्यापासून करत आहेत. या पार्श्वभूमिवर मनोज जरांगे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांच्यातील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
सगेसोयरे मुळेच घात; ही मागणी कायद्याला धरून आहे का ? आरक्षणाचे अभ्यासक सराटेंचे रोखठोक मत
दरम्यान, मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधून बाळासाहेब सराटे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. जरांगे पाटील म्हणाले, सगेसोयरेची अधिसूचना काढताना वाशीमध्ये तुम्ही होतात तेव्हा गोड वाटलं. तुम्हाला वाटतं ओबीसीपेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षण चांगल आहे. कशाला ते १६ टक्के आरक्षण चॅलेंज केलं? मराठा समाजाला, मला ढ समजता का? सरकारने तुम्हाला आमिष दाखवला असेल. अजूनही वेळ गेली नाही, मराठा अभ्यासकांनी अंतरावली सराटीत येऊन चर्चा करावी, अशा शब्दांत जरांगे पाटलांनी बाळासाहेब सराटे यांना उत्तर दिलं आहे.