लक्झरी गाड्यांचा ताफा, भक्तांची गर्दी अन् महिलांची गस्ती; भोले बाबांचं रहस्यमयी ‘हरि विहार’ आश्रम…

लक्झरी गाड्यांचा ताफा, भक्तांची गर्दी अन् महिलांची गस्ती; भोले बाबांचं रहस्यमयी ‘हरि विहार’ आश्रम…

Hathras Stampede : नुकतीच उत्तर प्रदेशातल्या हाथरसमधून दुर्घटनेची (Hathras Stampede) बातमी समोर आलीयं. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोले बाबांनी (Bhole Baba) आयोजित केलेल्या सत्संग कार्यक्रमात 100 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेलायं. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशातून लाखो भक्तांनी हजेरी लावल्याने ही दुर्घटना घडलीयं. भोले बाबांचं सत्संग सुरु असतानाच अचानक गर्दीतल्या लोकांना एकमेकांना लोटण्यास सुरुवात केली. या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलंय तर 116 लोकं जखमी झाले आहेत. यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. लाखोंचा जनसमुदाय त्यात भोले बाबा उर्फ नारायण हरि साकार (Narayan Hari Sakar) यांचं सत्संग. ग्वालियरमध्ये भोले बाबांचं आश्रम आहे. या आश्रमात नेहमीच लाखो भक्त येत जात असतात. भोले बाबांच्या कार्यक्रमात ही दुर्घटना घडल्यानंतर या आश्रमाबद्दल अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. एका वृत्तसंस्थेला इथल्या गावातील लोकांनी आश्रमाबाबत माहिती दिलीयं.

कॉंग्रेस-आपची युती संपुष्टात? दिल्ली आणि हरियाणामध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा

ग्वालियर शहरातील तिघरा रोडवर झंडा गाव आहे. या गावाला लागूनच नारायण हरि साकार उर्फ भोले बाबा यांचं आश्रम आहे. या आश्रमाचं नाव हरि विहार आहे. दुर्घटना घडण्याआधी या आश्रमात लोकांनी लाईन लागत होती. आता ‘हरि विहार’ लावण्यात आलेला बोर्ड झाकण्यात आलायं. हे आश्रम भोले बाबांनी भाड्याने घेतलं होतं. आश्रमात एक अलिशान बंगला आहे, त्या बंगल्यात बाबा थांबत होते.

या हरि विहार आश्रमात बाबांच्या प्रवचनासाठी एक मंच बनवण्यात आले होते. या मंचावरच बाबांनी काही दिवसांपूर्वी सत्संग केलं होतं. या सत्संगाला लाखो लोकं उपस्थित होते. भोले बाबा आश्रमात असताना मोठ्या संख्येने लोकं येत असत, यामध्ये काही महिलांचाही समावेश असल्याचा दावा गावकऱ्यांकडून केला जात आहे.

अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ विधीमधील मानुषी छिल्लरचा नवा अवतार; साडीत दिसतेय खासमखास!

या आश्रमामध्ये सर्वसामान्यपणे कोणालाही जाण्यास परवानगी नव्हती. आश्रमाच्या बाहेर नेहमीच सुरक्षा रक्षकांचा गरडा असायचा. हाथरस घटनेनंतर या ठिकाणी असेलेल्या सुरक्षा रक्षकांना हटवण्यात आले आहे. आता हरि विहार आश्रमाचं गेट खुलं असून कोणीही आत जाऊ शकतं. हरि विहार आश्रमात काही दिवसांपूर्वी भोले बाबा आले होते. या आश्रमात संपूर्ण उत्तर प्रदेशातून लोकं येत असत. सहारा सिटीमध्ये भोले बाबांचं सत्संग झालं, त्यावेळी एक कोटी लोकं सत्संग कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा दावा स्थानिक भोलू यादव यांनी केलायं.

दरम्यान, आश्रम राम अवतार कुशवाह यांच्या मालकीचे असून भोले बाबा यांच्या सत्संगच्या अध्यक्षांना आश्रम भाड्याने देण्यात आले होते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करु नका, याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र या आश्रमात महिलासेवकांचं येणं जाणं असल्याचा दावा गावकऱ्यांकडून केला जात आहे. या घटनेनंतर भोले बाबा यांच्यासह सत्संग आयोजकांवर पोलिसांकडू गुन्हा दाखल करण्यात आलायं. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube