तेराव्याहून परतणाऱ्या टेम्पोला बसची जोरदार धडक,भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू…

  • Written By: Published:
तेराव्याहून परतणाऱ्या टेम्पोला बसची जोरदार धडक,भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू…

Hathras Road Accident: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras Road Accident) भीषण अपघात झाला आहे. मॅक्स लोडर आणि रोडवेजच्या यांच्यात जोरदार धडक झाल्यानं हा अपघाच झाला. या भीषण अपघातात तब्बल 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मराठा समाजासाठी तुम्ही ऐक थेंबही रक्त सांडल नाही; आमदार राजेंद्र राऊतांचे जरांगेंवर टीकास्त्र 

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मॅक्स लोडर आणि रोडवेजच्या बसची धडक झाली. मॅक्समध्ये सुमारे 30 लोक होते. हे सर्व लोक तेराव्यासाठी मुकुंद खेडाला जात होते. तेरावं आटोपून ते खंदौलीतील सेवला येथे त्यांच्या घरी परतण्यातस निघाले. तेव्हा त्यांच्या वाहनाला आग्रा-अलिगड बायपास रोडवरील मिताई गावाजवळ अपघात झाला. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे.

महायुतीच्या नेत्यांच्या मनातही CM पदासाठी फडणवीसांचे नाव नाही, आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 

मॅक्स लोडर टेम्पोमध्ये प्रवास करणारे सर्व लोक आग्रा येथील खंदौलीतील सेमरा गावचे रहिवासी आहेत. हे सर्व लोक हातरस येथील सासनीमधील मुकुंदखेडाला गेले होते. तिथे तेराव्याचा कार्यक्रम होता. तेरावं आटोपून त्यांचा टेम्पो आग्राच्या दिशेने सुरू निघाला तेव्हा आग्राच्या दिशेने येणाऱ्या एका बसने त्यांच्या टेम्पोला रस्त्यावर धडक दिली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच डीएम आशिष पटेल आणि एसपी निपुण अग्रवाल यांच्यासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. भीषण अपघातात सेमरा गावातील 15 जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

या अपघातात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 पुरुष, 4 महिला, 4 लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अलिगड येथे हलवण्यात आलं.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. जखमींवर व्यवस्थित उपचार व्हावेत, यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube