9 दिवसांत 3 शहरे…अपमान, मारहाण अन् धमकी; जावयासह पळून गेलेल्या सासूने सांगितली आपबिती

9 दिवसांत 3 शहरे…अपमान, मारहाण अन् धमकी; जावयासह पळून गेलेल्या सासूने सांगितली आपबिती

Mother In Law Elopes With Son In Law Surrenders At Police Station : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील अलीगढ येथून 10 दिवसांपूर्वी फरार झालेल्या सासू अन् जावयाने अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. अलीगढची प्रसिद्ध जावई आणि सासूची जोडी परत आलीय. त्यांनी सांगितले की, ते 9 दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला (Viral News) गेले होते. तिथून बसने बरेलीला पोहोचले. मग तिथून तो थेट बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात गेले. काही दिवस तिथे राहिल्यानंतर नेपाळ सीमेकडे जाण्याचा विचार त्यांनी केला. परंतु जेव्हा त्यांनी मुझफ्फरपूरमध्ये मोबाईल बघितला, तेव्हा त्यांना दिसले की त्या दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

खूप व्हायरल झालो होतो. सगळीकडे आमच्याच बातम्या येत (Mother In Law Elopes With Son In Law) होत्या. जेव्हा जेव्हा मोबाईल उघडायचो, तेव्हा फक्त आम्हीच दिसायचो, असं होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूने सांगितलंय. 9 दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात शरण आल्याचं त्यानी म्हटलंय..

सासू आणि जावई कुठे गेले होते?

जावई राहुलने सांगितले की, ते 9 दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला गेली होती. तिथून दोघेही बसने बरेलीला पोहोचले. मग तिथून तो थेट बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात गेले. काही दिवस तिथे राहिल्यानंतर नेपाळ सीमेकडे जाण्याचाही विचार केला. पण जेव्हा मुझफ्फरपूरमध्ये मोबाईल पाहिला, तेव्हा त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू होती. यानंतर दोघांनीही स्वतःहून परतण्याचा निर्णय घेतला. मुजफ्फरपूरहून बस पकडली, वाटेत मथुरेच्या गया कट येथे उतरले. नंतर खाजगी गाडीने अलिगडला पोहोचले. तिथे ते दादोन पोलीस ठाण्यात गेले अन् त्यांनी आत्मसमर्पण केले.

अमित शाहांकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख; उद्धव ठाकरेंनी कडक शब्दांत सुनावलं!

पळून का गेले?

पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान सासू अनिताने धक्कादायक खुलासे केलेत. तिने सांगितले की, ती अनेक वर्षांपासून घरगुती हिंसाचाराची बळी होती. दारू पिऊन तिचा नवरा तिला दररोज मारहाण करायचा. तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून अपमान करायचा आणि अनेक वेळा घराबाहेर काढण्याची धमकीही द्यायचा. तिच्या मुलीचे लग्न राहुलसोबत ठरले होते. राहुल जेव्हा जेव्हा फोन करायचा, तेव्हा कधी माझी मुलगी बोलायची तर कधी ती स्वत: बोलायची. मुलगी आणि नवरा दोघांनाही त्यांच्यावर संशय येऊ लागला. घरात कलह वाढला. ‘आता, राहुलसोबत पळून जा ‘, असे टोमणे नवरा तिला वारंवार मारायचा. त्यामुळे तिने तिला जे योग्य वाटलं ते केलं..

राहुलने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय की, तो सासू अनिताला आधीपासून ओळखतो. कारण, त्याचा साखरपुडा सासूच्या घरी झाला होता. जे घडलं ते सर्वांसाठीच धक्कादायक होतं. परंतु हे सगळं सासूच्या आग्रहामुळंच घडलंय. ती माझ्याशी बोलायची, रडायची. मला आता जगायचं नाही, असं म्हणायची. त्याला वाटले सासूला जर असंच सोडलं, तर ती काहीतरी वेगळं करील. त्यामुळे तो देखील तिच्यासोबत सामील झाला. तर एसएचओने सांगितलं की, अनिता देवी अन् राहुल दोघेही प्रौढ आहे. त्यांनी स्वत: आत्मसमर्पण केलंय.

जावयाने कबूल केलंय, जे घडले ते सर्वांनाच धक्कादायक होते, पण सासूच्या आग्रहावरूनच त्याने हा निर्णय घेतला. राहुल म्हणाला की, ती माझ्याशी बोलत असे, रडत असे आणि म्हणायचे की तिला आता जगायचे नाही. मला वाटले की जर मी तिला असेच सोडले तर ती काहीतरी चूक करेल. म्हणूनच मी त्याच्यात सामील झालो. एसएचओने सांगितले की अनिता देवी आणि राहुल दोघेही प्रौढ आहेत आणि त्यांनी स्वतःहून येऊन आत्मसमर्पण केले आहे. सीओ म्हणाले की आता महिलेचा जबाब नोंदवला जाईल. त्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. सध्या त्या महिलेला वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असं सीओ म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube