अमित शाहांकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख; उद्धव ठाकरेंनी कडक शब्दांत सुनावलं!

Udhav Thackeray On Amit Shah : अमित शाहांनी (Amit shah) रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये, अशा कडक शब्दांत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांना सुनावलंय. नाशिकमध्ये आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल चढवलायं.
स्पष्ट सांगा, मुस्लिमांना हिंदू संस्थांमध्ये संधी मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस त्यावर गप्प बसून होते. सत्ता नसताना जे सोबती आहेत तेच निष्ठावान आहेत. बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी पुण्याई उभी केली. त्यामुळे मला सत्तेची गरज नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन सुरू
अमित शाहांनी आम्हाला सांगू नये – उद्धव ठाकरे
चार दिवसांपूर्वी अमित शाह रायगडवर आले आणि त्यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की, शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमीत ठेऊ नका. पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सूरत लुटली त्यावेळी त्याची बातमी ही लंडन गॅझेटमध्ये छापून आली होती. त्यामुळे अमित शाहांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा – ठाकरे
अमित शाहजी जर तुम्हाला खरोखर शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा. फक्त मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करु नका अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.