Yes Securities : न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे संतप्त झालेल्या दिल्लीतील ग्राहक न्यायालयाने येस सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड (YSIL)ची बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत. मागील आदेशात, YSIL ला ग्राहक नरेश चंद जैन यांना मानसिक छळ आणि नुकसानीसाठी सबस्क्रिप्शनच्या रकमेसह भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
कारवाई का केली?
कंपनीने आदेशाचे पालन न केल्याने दिल्ली जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या (उत्तर जिल्हा) अध्यक्षा दिव्या ज्योती जयपूरियार आणि सदस्य हरप्रीत कौर चार्य आणि अश्विनी कुमार मेहता यांनी ही कारवाई केली. 18 जानेवारी रोजी, ग्राहक न्यायालयाने येस बँक लिमिटेडच्या या पूर्ण मालकीच्या उपकंपनीला 9 टक्के वार्षिक व्याजासह 59,000 रुपये (50,000 अधिक GST) परत करण्याचे आदेश दिले होते.
Sony Network Down: नेटकऱ्यांकडून तक्रारींचा भडीमार; सोनी प्लेस्टेशन नेटवर्क का झालं डाऊन?
याशिवाय तक्रारदाराला 50 हजार रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचेही निर्देश कंपनीला देण्यात आले होते. न्यायालयाने कंपनीची मुंबईस्थित येस बँक आणि एचडीएफसी बँक ही दोन बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले. जेणेकरून निकालाची अंमलबजावणी करता येईल. न्यायालयाने येस बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना तात्काळ प्रभावाने खाती गोठवण्याचे निर्देश दिले. बँकांना एका आठवड्यात अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
ग्राहक नरेश चंद जैन (ज्येष्ठ नागरिक) यांनी कंपनीवर सबस्क्रिप्शन योजनेंतर्गत सेवा न दिल्याचा आरोप केला होता. जैन यांनी YSIL वर त्यांच्या प्रीमियम रिसर्च सर्व्हिस “सिल्व्हर स्कीम” अंतर्गत सेवा न पुरवल्याचा आरोप केला होता. तक्रारदाराने रु. 59000 भरले होते. पण कंपनीने फिजिकल शेअर्सचे डीमॅट खात्यात रूपांतर करण्यात आणि मार्केट रिसर्च आणि गुंतवणुकीच्या सूचना ग्राहकाला दिल्या नाहीत. त्यामुळे ग्राहक नरेश यांचे नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली.