Download App

Video: ‘आपकी टोन ठीक नही’; खासदार जया बच्चन यांचा आरोप; राज्यसभा सभापती जोरदार भडकले

आज राज्यसभेत सभापती जगदीप धनकड आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्यात जोरदार घमासान झालं. त्यामध्ये जया बच्चन यांचा मोठा आरोप.

  • Written By: Last Updated:

Jaya Bachchan vs Jagdeep Dhankad : आज राज्यसभेत सभापती जगदीप धनकड आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्यात जोरदा घमासान झालं. मात्र, यावेळी जया बच्चन यांनी धनकड यांच्यावर गंभीर आरोप केल्याचही समोर आलं आहे. राज्यसभेत बोलण्यासाठी उभ्या राहिल्या असताना जया बच्चन म्हणाल्या, मी एक कलाकार आहे. मला आपली भाषा, आपली देहबोली चांगली समजते. यावर सभापती धनकड जोरदार भडकले. तुम्ही कलाकार आहात तर कलाकाराला दिग्दर्शकाचं ऐकावं लागतं. (Jaya Bachchan) मी इथ दिग्दर्शक आहे माझं ऐका. यावर राज्यसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. त्यानंतर विरोधकांनी बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

देशासाठी पदक जिंकल्याचा आनंदच पण आता; रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरजनं काय सांगितलं?

तुम्ही अपमान करत आहात

तुम्ही मोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत. तुम्ही सेलिब्रिटी आहात. असं असताना माझ्या टोनवर प्रश्नचिन्ह उभं करत आहात? मी हे सहन करणार नाही. दरम्यान, जगदीप धनखर यांनी जया बच्चन यांना सेलिब्रिटी म्हणताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला. जया बच्चन या संसदेच्या ज्येष्ठ सदस्य आहेत, मग त्यांना तुम्ही सेलिब्रिटी कसं म्हणू शकता? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. यावर जगदीप धनखर म्हणाले, ज्येष्ठ सदस्य खुर्चीचा अवमान करत आहेत. चर्चेदरम्यान सर्व विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहातून सभात्याग केला. विरोधकांच्या वॉकआऊटवर जगदीप धनखर म्हणाले की, या सर्वांना चर्चेत भाग घ्यायचा नाही आणि ते आपल्या कर्तव्यावरून वॉकआउट करत आहेत.

Tags

follow us