Government Ban on Import of Watermelon Seeds : केंद्र सरकारने कलिंगडाच्या बिया आयात (Watermelon Seeds) करण्यावर बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादकांच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षांत कलिंगडाच्या बियांची (Ban on Import of Watermelon Seeds) मोठ्या प्रमाणात आयात केली होती. त्यामुळे आता आयात बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार सन 2023-24 मध्ये भारताने 83 हजार 812 टन कलिंगडाच्या बिया विदेशातून खरेदी केल्या होत्या. मागील तीन वर्षांच्या तुलनेत जवळपास दुपटीने बिया खरेदी करण्यात आल्या. लघु उद्योग भारतीने अपील केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला.
देशात कलिंगडाच्या बियांची वार्षिक मागणी जवळपास 60 हजार ते 65 हजार टन इतकी (Benefits of Watermelon Seeds) आहे. देशांतर्गत उत्पादनाचा विचार केला तर हा आकडा 40 हजार टन इतका होतो. म्हणजेच भारत दरवर्षी 20 हजार ते 25 हजार टन बियांची आयात करतो. भारतीय किसान संघाचे राजस्थान राज्याचे महासचिव तुलचाराम सिवार यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणात आयात केल्याने देशांतर्गत उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. हायब्रीड बियांमुळे उत्पादन जास्त होत असले तरी यामुळे जमिनीची गुणवत्ता खराब होते. पारंपरिक पिके घेणारे शेतकरीही यामुळे अडचणींत सापडले आहेत.
कर्जाच्या नावाखाली सुरू असलेला गोरखधंदा होणार बंद; सरकारचा ‘तो’ कायदा अंतिम टप्प्यात
विदेशातून येणाऱ्या कलिंगडाच्या बिया या देशातील बियांपेक्षा 15 ते 20 टक्के स्वस्त असतात. यामुळे देशांतर्गत बाजारात उत्पादकांना आर्थिक नुकसान होत आहे. आता सरकारने निर्बंध टाकल्याने देशातील बियांची किंमत वाढेल तसेच देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल, असे सिवार यांनी सांगितले.
भारतात कलिंगड उत्पादन : जवळपास 30 लाख टन
प्रमुख उत्पादक राज्य : उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक
प्रसिद्ध प्रजाती : अर्का माणिक, अर्का ज्योती, असाही यामाटो, दुर्गापूर मीठा, ब्लॅक थंडर
टरबुजाची निर्यात (2023-24) : जवळपास 65 हजार टन. नेपाळ, बांगलादेश आणि मध्य पूर्वेतील देश
कलिंगडाच्या उत्पादनात चीन आघाडीवर आहे. चीनमध्ये दरवर्षी तब्बल 79 मिलियन टन (Watermelon in China) टरबुजाचे उत्पादन होते. अन्य मोठ्या कलिंगड उत्पादक देशांमध्ये तुर्की, इराण, ब्राझील, उज्बेकिस्तान, अल्जीरिया, अमेरिका, रशिया, इजिप्त आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे. या देशांत कलिंगडाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.