Download App

शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 1062 अंकांनी घसरला; वाचा तज्ञांच मत

भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरण झाली. आज सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी २२ हजारांच्या खाली आला

Image Credit: letsupp

Sensex Closing Bell : सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या दबावामुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरण झाली आहे. (Stock Market) शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली आहे. आज सेन्सेक्स (Sensex) सुमारे १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३५० पेक्षा अधिक अंकांनी घसरून २२ हजारांच्या खाली आला.

 

शेअर बाजारात आपटीबार गुंतवणूकदारांना धक्का, इराण-इस्रायल तणावाचा दिसला मोठा इफेक्ट!

सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण

यामध्ये सेन्सेक्स १,०६२ अंकांच्या घसरणीसह ७२,४०४ वर बंद झाला. तर निफ्टी ३४५ अंकांनी घसरून २१,९५७ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची घसरण अनुक्रमे १.४५ टक्के आणि १.५५ टक्के अशी आहे.

 

गुंतवणूकदारांना मोठा फटका

बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ७.०१ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. यामुळे ९ मे रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३९३.६८ लाख कोटींपर्यंत खाली घसरलं. ८ मे रोजी बाजार भांडवल ४००.६९ लाख कोटी रुपयांवर होतं. परिणामी कंपन्यांच्या बाजार भांडवलाचं ७.०१ लाख कोटींचं नुकसान झालं आहे.

 

तज्ञांचं मत काय

तज्ज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली अनिश्चितता आणि तिमाही निकालांमधील कंपन्यांच्या कामगिरीचा बाजारातील भावावर परिणाम यामध्ये मोठी तफावत आढळते. भारत VIX, अस्थिरता निर्देशांक 6.5% वाढून 18.20 वर पोहोचला. सलग 11व्या सत्रात ही वाढ झाली आहे.

 

Share Market Scam: शेअर मार्केट! ट्रेडर तुपाशी तर गुंतवणूकदार उपाशी

बाजारातील स्थिती

बीएसई मिडकॅप २ टक्क्यांनी घसरला
स्मॉलकॅपची २.४१ टक्क्यांनी घसरण
ऑटो सोडून इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले
निफ्टी ऑईल अँड गॅस ३ टक्क्यांनी घसरला
निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक अनुक्रमे १ आणि २ टक्क्यांनी घसरले
निफ्टी ऑटो निर्देशांक ०.८ टक्क्यांनी वाढला

 

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्स आज ७३,४९९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,४०० च्या खाली आला. एलटी, एशियन पेंट्स, आयटीसी, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर टाटा मोटर्स, एम अँड एम, एसबीआय, एचसीएल टेक, इन्फोसिस या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

 

निफ्टी ५० वर एलटी, एशियन पेंट्स, कोल इंडिया, बीपीसीएल, ओएनजीसी हे शेअर्स टॉप लूजर्स होते. हे शेअर्स ३ ते ६ टक्क्यांपर्यंत घसरले. तर हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, टाटा मोटर्स, एसबीआय, एचसीएल टेक हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले.

follow us

वेब स्टोरीज