Download App

Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

Arvind Kejriwal : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून

  • Written By: Last Updated:

Arvind Kejriwal : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कथित दारू घोटाळ्या प्रकरणात करण्यात आलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली होती. यावर आज निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना मोठा दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून करण्यात आलेली अटक योग्य आहे की अयोग्य यावर सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही.

तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर देखील केजरीवाल तुरुंगातून बाहेर येणार नाही. याच कारण म्हणजे सीबीआयकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, पीएमएलच्या कलम 19 च्या पॅरामीटर्सचा विचार करण्यात करण्यात आला आहे.

आम्ही कलम 19 आणि कलम 15 मधील फरक स्पष्ट केला आहे. त्यामुळे जोपर्यंत मोठे खंडपीठ निर्णय घेत नाही तोपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यात यावा. असं  खंडपीठाने म्हटले होते.

सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की हवाला चॅनेलद्वारे आम आदमी पार्टीला पैसे पाठवले जात असल्याचा पुरावा आहे.

तर केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की  ईडीकडून मुख्यमंत्र्यांच्या अटकेचा बचाव करण्यासाठी जे पुरावे आता दिले जात आहे ते त्यांच्या अटकेच्या वेळी उपस्थित नव्हते. लोकसभा निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांना 21 दिवसांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या याच खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केला.

आम्ही शाळेत कसं जायचं..? शालेय विद्यार्थ्यांसह पालकांचा सवाल

follow us