रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर येथे 24 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (Indian National Congress) 85 व्या पूर्ण अधिवेशनासाठी (convention) काँग्रेस अध्यक्षांनी तत्काळ प्रभावाने घटना दुरुस्ती समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे अंबिका सोनी यांना अध्यक्ष आणि रणदीप सिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांना समन्वयक बनवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ज्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या मिळाल्या, मसुदा समिती
अशोक चव्हाण सदस्य, श्री मुकुल वासनिक सदस्य, पृथ्वीराज चव्हाण सदस्य
राजकीय घडामोडी उपसमूह, अशोक चव्हाण संयोजक, आरिफ नसीम खान सदस्य, यशोमती ठाकूर, सदस्या
आर्थिक घडामोडी उपसमूह, मिलिंद देवरा सदस्य, प्रणिती शिंदे सदस्या, नितीन राऊत सदस्य
शेतकरी आणि कृषी उपसमूह, नाना पटोले सदस्य
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण उपसमूह, मुकुल वासनिक अध्यक्ष, शिवाजीराव मोघे सदस्य, विजय नामदेवराव वडेट्टीवार सदस्य
युवा शिक्षण आणि रोजगार उपसमूह, वर्षा एकनाथ गायकवाड सदस्या