नवी दिल्ली : भोजपुरी स्टार पवन सिंह यांची भाजपने (BJP) पक्षातून हकालपट्टी केली आहे. एनडीएच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवल्याबद्दल ही हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत बिहार भाजपचे प्रभारी अरविंद शर्मा यांनी एक पत्र जारी केले आहे. (Bihar BJP expels Bhojpuri singer Pawan Singh)
Bihar BJP expels Bhojpuri singer Pawan Singh for contesting Lok Sabha elections against NDA's official candidate, as an independent candidate.
Pawan Singh had earlier announced his decision to contest from Karakat Lok Sabha constituency as an Independent candidate. pic.twitter.com/kLYbCWXMXm
— ANI (@ANI) May 22, 2024
कारवाईच्या पत्रात नेमकं काय?
पवन सिंग यांच्या हकालपट्टीबाबत जारी करण्यात आलेल्या पत्रात लोकसभा निवडणुकीत NDA चे अधिकृत उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिकी पक्षविरोधी आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली असून, पक्षविरोधी काम केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्या सूचनेवरून तुमची हकालपट्टी करण्यात येत आहे.
एका म्यानात दोन तलवारी नकोयत… पंकजा मुंडेंचा पराभव ‘फडणवीस आणि धनंजय’ हेच करतील
पवन सिंह करकट येथून अपक्ष उमेदवार
वास्तविक, पवन सिंह बिहारमधील करकट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी अनेकवेळा पीएम मोदींविरोधातही वक्तव्ये केली आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते प्रेम कुमार यांनी पक्ष पवन सिंह यांच्यावर कारवाई करू शकतो, असा इशारा दिला होता. त्यानंतर आता भाजपने पवन सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
मोदींच्या सभेपूर्वी कारवाई
करकट लोकसभा जागेसाठी सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार असून, NDA कडून उपेंद्र कुशवाह हे उमेदवार आहेत. या जागेवर तिरंगी लढत होत असून, महाआघाडीकडून राजा राम कुशवाह रिंगणात आहेत. त्यात पवन सिंह यांनी अपक्ष उमेदवारी भरल्यामुळे ट्विस्ट वाढला आहे. मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 मे रोजी करकट येथे निवडणूक प्रचारासाठी सभा घेणार आहेत. मात्र, मोदींच्या (Narendra Modi) आगमनापूर्वीच भोजपुरी स्टार पवन सिंह यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.