पटणा: जातीय जनगणना व आरक्षणाची मर्यादा वाढविण्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) हे सध्या देशभर चर्चेत आहेत. परंतु विधिमंडळात लोकसंख्या नियंत्रण व मुलींच्या शिक्षणावर बोलताना नितीश कुमार यांची जीभ चांगलीच घसरली. लोकसंख्या नियंत्रण व मुलींच्या शिक्षणावर बोलताना ते अश्लिल व वादग्रस्त बोलून गेले. त्यांचा तो व्हिडिओ आता व्हायरल झाला. नितीश कुमार हे ‘गंदी बात’ करत असताना सभागृहात असलेल्या महिला मंत्री व महिला आमदारांची कुंचबणा झाली. नितीश कुमार हे विधान परिषदेत बोलत असताना त्यांच्या पाठीमागे एक महिला मंत्री बसलेल्या होत्या. त्यावेळी त्या इकडे तिकडे बघत होत्या. त्या आपला तोंड लपवत होत्या.
#WATCH | Bihar CM Nitish Kumar uses derogatory language to explain the role of education and the role of women in population control pic.twitter.com/4Dx3Ode1sl
— ANI (@ANI) November 7, 2023
त्यावरून आता विरोधकांनी नितीश कुमार यांना जोरदार घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या आमदार निवेदता सिंह यांनी नितीश कुमार यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, नितीश कुमार यांनी लज्जास्पद वर्तन केले आहे. सभागृहात महिला आमदार उपस्थित होते. त्याचा विचार नितीश कुमार यांनी केला नाही. मुख्यमंत्री बोलत असताना सर्व जण त्यांना एेकत होते. ते असे बोलायला लागल्यानंतर मी सभागृहातून बाहेर पडले. मी त्यांना उत्तर दिले असते. परंतु आमचे नेतेही सभागृहात होते. त्यामुळे शांतपणे निघून गेले.
जखमी मॅक्सवेलने द्विशतक झळकावत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरी धडक
मुख्यमंत्री नितीश कुमार हे विधानसभेतही विचित्र बोलले होते. त्यानंतर हे विधानपरिषदेमध्ये त्यांनी विचित्र शब्द वापरले आहेत. लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करत विचित्र टिप्पणी केली. यामुळे महिला आमदार खाजिल झाल्या. तर काही पुरुष आमदारही हसतही होते. परंतु आता विरोधकांनी नितीश कुमार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. तसेच माफी मागण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे. नितीश कुमार यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.