जखमी मॅक्सवेलने द्विशतक झळकावत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरी धडक

जखमी मॅक्सवेलने द्विशतक झळकावत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरी धडक

Australia Vs Afghanistan : ग्लेन मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे येथे द्विशतक झळकावून इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने सर्वात मोठी खेळी केली आणि हरलेला सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. एकेकाळी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 91 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, परंतु ग्लेन मॅक्सवेलने 201 धावांची इनिंग खेळून आपल्या संघाला हरवलेला सामना जिंकून दिला. मॅक्सवेलने 21 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस पाडला आहे.

अफगाणिस्तानने प्रथम खेळून 291 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 91 धावा आणि सात गडी गमावले होते. यानंतर मॅक्सवेल आणि कमिन्स यांनी 202 धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानचा विजय हिरावून घेतला. या खेळीमध्ये मॅक्सवेलला त्याच्या वैयक्तिक 33 धावांच्या धावसंख्येवर जीवदान मिळाले. याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.

बांग्लादेशला मोठा धक्का, शाकीब अल हसन विश्वचषकातून बाहेर

292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या षटकात ट्रॅव्हिस हेडच्या (0) रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. यानंतर सहाव्या षटकात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मिचेल मार्शने 11 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. संघ दुसऱ्या विकेटच्या धक्क्यातून सावरत असताना 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 18 धावांवर अझमतुल्ला ओमरझाईचा बळी ठरला.

विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पहिले शतक, ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर

यानंतरही ऑस्ट्रेलियाची विकेट्स गमावण्याची गती थांबली नाही आणि पुढच्याच चेंडूवर जोश इंग्लिसही उमरझाईचा बळी ठरला. त्यानंतर 15व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्नस लॅबुशेन 14 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर 17व्या षटकात मार्कस स्टॉइनिस 06 धावांवर बाद झाला आणि 19व्या षटकात मिचेल स्टार्क 03 धावांवर बाद झाला. यानंतर मॅक्सवेल आणि कर्णधार कमिन्सने जबाबदारी स्वीकारली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला.

मॅक्सवेलने 128 चेंडूत 157.03 च्या स्ट्राइक रेटने 201 धावांची ऐतिहासिक खेळी केली, यात 21 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान, मॅक्सवेलला अनेकवेळा क्रॅम्पचा सामना करावा लागला, परंतु निवृत्तीनंतर, तो क्रीजवर राहिला आणि त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. धावताना मॅक्सवेल खूप अडचणीत दिसत होता. दुसरीकडे, कर्णधार कमिन्सने मॅक्सवेलला चांगली साथ दिली आणि 68 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 12 धावांची खेळी केली. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने 2023 च्या विश्वचषकातील सर्वात रोमांचक विजयावर आपले नाव कोरले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube