Bihar CM Oath Nitish Kumar : बिहारमध्ये पुन्हा नितीशराज (Nitish Kumar) सुरू झाले आहे. नितीश कुमार यांना दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्यांच्याबरोबर इतर 26 मंत्र्यांना शपथ देण्यात आलीय. जेडीयूला (JDU) मुख्यमंत्रिपद दिल्याने भाजपने सर्वाधिक मंत्रिपदे घेतलीय. भाजपच्या (BJP) 14 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. तर जेडीयूला 9 मंत्रिपदे मिळाली आहे. तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोजपाला (रामविलास पासवान) दोन आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाला एक मंत्रिपद मिळाले आहे. तर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला एक मंत्रिपद मिळाले आहे. (Bihar Cabinet Oath Taking BJP takes most JDU LJP R Chirag Paswan Jitanram Manjhi)
Arunabh Kumar : TVF चे संस्थापक अरुणाभ कुमारांचा पत्नी श्रुती आणि मुलगी मिशासाठी खास संदेश
बिहारमध्ये एनडीएला 202 जागा मिळत स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या. तर नितीशकुमार यांच्या जदयूला 85 जागा मिळाल्या. तर चिराग पासवान यांच्या पक्षाला 19, जीतनराम मांझी यांच्या पक्षाला पाच आणि कुशवाह यांच्या पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत. तर दोन उपमुख्यमंत्रीपद या मंत्रिमंडळात राहणार असून, सम्राट चौधरी आमि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहणार आहेत.
नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळातील मंत्री
विधानपरिषदेवर असलेले भाजपचे दिलीप जायसवाल यांनाही स्थान मिळाले आहे. तर लेशी सिंह (जदयू), नितीन नवीन (भाजपा), मदन सहानी (भाजप), सुरेंद्र मेहता (भाजप), नारायण प्रसाद (भाजप), रमा निषाद (भाजप) लखेंद्र रोशन (भाजप), श्रेयसी सिंह (भाजप), विजयकुमार चौधरी (जदयू), श्रवण कुमार (जदयू), विजेंद्र यादव ( जदयू), अशोक चौधरी ( जदयू), मंगल पांडेय (भाजप), संतोष सुमन (हम, विधानपरिषद), सुनील कुमार (जदयू), जमा खान (जदयू), संजयसिंह टायगर (भाजप), अरुण शंकर प्रसाद (भाजप), डॉ. प्रमोद चंद्रवंशी (भाजप), संजयकुमार सिंह (लोजपा), संजयकुमार (लोजपा), दीपक प्रकाश (राष्ट्रीय लोक मोर्चा, कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत)
Pune Crime : कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून एकाचा मृत्यू…
राजकीय वारसांचे नवे चेहरे
या मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांना पहिली पसंदी मिळाली असली तरी काही राजकीय वारसदारांना संधी मिळाले आहेत. श्रेयसी सिंह या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची ती मुलगी आहे. तर ती आंतराष्ट्रीय नेमबाज आहेत. केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा मुलगी संतोष कुमार सुमन यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे.
उपेंद्र कशुवाहाच्या मुलाची वाइल्ड कार्ड एन्ट्री
राष्ट्रीय लोक मोर्चाचे माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या मुलाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. दीपक प्रकाश हे कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे आता त्यांना विधानपरिषदेवर घेतले जाणार आहे.
