Bihar Exit Polls Results 2025: बिहार विधानसभेसाठी (Bihar Assembly Election) दोन्ही टप्प्यामध्ये विक्रमी मतदान झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहे. या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जडयूचे नेते व मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांचा जलवा दिसला आहे. सर्वच एक्झिट पोलनुसार बहुमताने एडीएचे सरकार स्थापन होत आहे. बिहारचे निवडणूक जिंकून काँग्रेस आणि आरजेडीला करिश्मा करायचा होता. तसे स्वप्न दोन्ही पक्षांचे होते. परंतु प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षाने हे स्वप्न धुळीस मिळाल्याचे बोलले जात आहे. (Bihar Exit Polls Results 2025’Modi-Nitish’ rule again in Bihar; Dream of ‘Grand Alliance’ shattered due to Prashant Kishor factor)
बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार की तेजस्वी होणार मुख्यमंत्री, वाचा एक्झिट पोलचा अंदाज
राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस, लेफ्ट, विकासशील इन्सान पार्टीने एकत्र येऊन महागठबंधन म्हणजे महाविकास आघाडी निवडणुकीची रिंगणात उतरविली होती. मतदार याद्यांच्या दुरुस्तीवरून काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना बिहारमध्ये रॅली काढली होती. परंतु राहुल गांधींचा रॅलीचा जलवा प्रत्यक्ष निवडणुकीत दिसून आला नाही. दैनिक भास्कर, मॅट्रिज, पीपुल्स इनसाइट, चाणक्य यांच्यासह नऊ एक्झिट पोलने एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज लावला आहे. एनडीए आघाडीला 130 ते 167 जागा मिळतना दिसत आहेत. तर महागठबंधनला 73 ते 108 जागा मिळताना दिसत आहे. सर्व पोल्सचा सरासरीनुसार एडीएला 147 आणि महागठबंधनला 90 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.
आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंना धक्का; भीमराव धोंडेंचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीत केला प्रवेश
प्रशांक किशोर भाजपची ‘बी’ टीम ?
प्रशांत किशोर यांनी बिहारच्या निवडणुकीत रंगत आणली होती. परंतु प्रशांत किशोरच्या जनसुराज पक्षाला खास काही करता आलेले नाही. जनसुराज पक्ष खाते उघडून पाच ते सहा जागा जिंकू शकतो, असा काही एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर प्रशांत किशोर यांच्या पक्षामुळे आरजेडी आणि काँग्रेस पक्षाचे मते कमी झाल्याचा अंदाजही आहे. एनडीए आणि महागठबंधन या दोन्ही पर्याय नको म्हणून लोकांनी प्रशांत किशोरच्या पक्षाला मते दिली आहेत. त्यात काँग्रेस, आरजेडी यांच्या पक्षाचे मते फुटली आहे. 14 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. त्यात जनसुराज पक्षाने घेतलेल्या मतानुसार वेगवेगळे आडाखे बांधले जातील. त्यामुळे प्रशांत किशोर यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जाईल.
आरजेडीला फटका, काँग्रेस आणखी तळात ?
एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला 57 ते 69 जागा मिळण्याचे शक्यता आहे. मागील वेळी आरजेडीला सर्वाधिक 75 जागा होत्या. तर काँग्रेसला फारच कमी जागा मिळताना दिसतायत. काँग्रेसला 14 ते 11 जागा मिळू शकतात. गेल्यावेळेस काँग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या.
नितिशकुमारांची कामगिरी जबरदस्त, जेडीयू सर्वात मोठा पक्ष ?
भाजपला 67 ते 70 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मागील वेळा भाजपला 75 जागा होत्या. त्यात काही कमी झाल्या आहेत. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेटने जबरदस्त कामगिरी केलीय. मागील वेळी 43 जागा जिंकणाऱ्या जेडीयूला 58 ते 71 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यात नितीश कुमार यांचा पक्ष सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर महागठबंधन म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.
मुख्यमंत्री कुणाचा ?
सर्वाधिक मोठा पक्ष आरजेडी ठरल्यास नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा शर्यतीत असतील. परंतु भाजपला बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री बसवायचा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून नितीश कुमार आणि भाजपमध्ये रस्सीखेच होऊ शकते. परंतु केंद्रातील संख्याबळ पाहता भाजप हे नितीश कुमारांना दुखविणार नाहीत. त्यामुळे नितीश कुमार हे पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात.
