Download App

मास्टरस्ट्रोक! 2025 मध्ये फायरब्रँड ‘सम्राट’ होणार नेक्स्ट CM?; नितीश कुमार यांना घरी बसवत काढणार पगडी

  • Written By: Last Updated:

पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या सत्ता समीकरणात भाजपनं बिहारमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या विधानभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनतेसमोर ठेवला आहे. त्यामुळे 2025 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची लढत सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) विरुद्ध तेजस्वी यादव होणार हे चित्र आता जवळपास निश्चित झाले आहे. सम्राट चौधरी हे मागास जातीतील असून आता ते बिहारमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांना चितपट करण्यासाठीच भाजपकडून सम्राट चौधरी यांना मैदानात उतरवल्याचेही बोलले जात आहे.

‘आयाराम, गयाराम’लाही नितीश कुमारांनी मागं टाकलं; शरद पवारांची खोचक टीका

बिहारमध्ये एकीकडे राजकीय उलटफेर होत असतानाच मात्र चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे भाजपच्या मास्टर स्ट्रोकची. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करत भाजपनं 2 उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभेचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले आहे. यामुळे भाजपने नितीश यांची भविष्यातील पलटी मारण्याची सर्व दारे बंद केली आहेत.

आज शपथ घेऊ दे.. पण खेळ आताशी सुरु झालाय… : तेजस्वी यादवांचा नितीश कुमांना जाहीर इशारा

जातीचं राजकारण अन् मतांचं गणित

सम्राट चौधरी हे खगरिया जिल्ह्यातील परबट्टा येथून आमदार असून, यापूर्वीच्या एनडीए सरकारमध्ये ते पंचायतराज मंत्री होते. 54 वर्षीय सम्राट चौधरी बिहारमधील लखनपूर गावचे रहिवासी असून ते, लवकुश (कोरी-कुर्मी) येथील कुश म्हणजेच कुशवाह समाजाचे नेते आहेत. चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी खासदार आणि मंत्री राहिले आहेत. घराण्याचा वारसा पुढे नेत सम्राट चौधरी यांनी 1990 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1999 मध्ये त्यांना पहिल्यांदा राबरी मंत्रिमंडळात स्थान मिळाले. ते कृषी (वजन व फलोत्पादन) खात्याचे मंत्री झाले. नंतर त्यांनी राजद सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

Nitish Kumar : आमदारांच्या बैठकीतच PM मोदींचा फोन; चर्चा केली अन् राजीनामाच दिला

भाजपने सम्राट चौधरी यांना पहिले प्रदेशाध्यक्ष केले. त्यानंतर आता त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या जबाबदारीमागे पक्षाची खास रणनीती असल्याचे बोललं जात आहे. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेत मागासवर्गीत मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्यास भाजपनं सुरूवात केली आहे. बिहारमध्ये यादवांनतर सर्वाधिक मते देणारा समाज कोणता असेल तर तो कुशवाह समाज आहे. ही नाडी पकडत भाजपनं राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी सम्राट चौधरी यांच्या माध्यमातून सुरूवात केली आहे.

नितीश कुमार यांना हटवण्यासाठी बांधली होती पगडी

एकीकडे नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तांतर केले आहे. तर, दुसरीकडे नितीश कुमार यांना पदावरून हटवण्याची शपथ घेतलेल्या सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री केले आहे. मात्र, नितीश कुमार यांना जोपर्यंत मुख्यमंत्रीपदावरून हटवत नाही तोपर्यंत डोक्यावरची पगडी काढणार नाही अशी शपथ सम्राट चौधरी यांनी घेतली होती. मात्र, आता तेच सम्राट चौधरी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता सम्राट पगडी काढणार की 2025 मध्ये नितीश कुमार यांना घरी बसवत स्वतः मुख्यमंत्री होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज