Video : विरोधकांचं टेन्शन वाढलं; धीरज घाटेंनी पुण्यातील भाजपच्या विजयी जागांचा आकडाच सांगितला

Dhiraj Ghate Exclusive : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप पूर्ण बहुमताने बाजी मारणार असा विश्वास पुणे

Dhiraj Ghate

Dhiraj Ghate Exclusive : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप पूर्ण बहुमताने बाजी मारणार असा विश्वास पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी लेट्सअप मराठीच्या लेट्सअप विशेष या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे. पुण्यात भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरज घाटे यांनी या कार्यक्रमात बोलताना पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 125 जागा निवडून येणार असा दावा केला आहे. तसेच या निवडणुकीत तिकीट वाटपावरुन भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला फटका बसणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

पुणे महापालिका निवडणुकीत (Pune Municipal Corporation Election) भाजपला किती जागा मिळणार? यावर बोलताना धीरज घाटे (Dhiraj Ghate) म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 125 नगरसेवक निवडून येतील अशी मला खात्री आहे. तसेच या निवडणुकीत तिकीट वाटपाचा फटका भाजप (BJP) उमेदवारांना बसणार का ? यावर देखील धीरज खाटे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, असं होणार नाही, कारण शेवटी मतदार हा कमळाला मतदान करणार आहे. ही व्यक्तीगत निवडणूक नाही. धीरज घाटे म्हणून लोक मतदार करत नाही. यापूर्वी असं असायचं प्रभागामध्ये मतदारांची संख्या कमी होती आणि तिथं ज्याची पावर होती तो निवडून यायचं मात्र आता असं होत नाही. प्रभागामध्ये मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिथं कमळ चालणार कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम पाहून जनता मतदान करणार आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने पुण्यात जर महापालिकेत सत्ता भाजपची असेल तर विकास काम अधिक वेगाने होईल त्यामुळे पुणेकर भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असं धीरज घाटे म्हणाले.

Shekhar Bapu Rankhambe : ‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण!

तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये धीरज घाटे यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या दरम्यान भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातून मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग प्रवेश सुरु असल्याने भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर देखील धीरज घाटे यांनी आपली भूमिका मांडली. धीरज घाटे म्हणाले की, पुण्यात 165 जागा आहे आणि भाजपमध्ये इतर पक्षातून आलेयेत त्यांची संख्या 15 ते 20 आहे. 165 मधील 20 जागा सोडल्या तर 145 जण भाजपचे आहे. मागच्या वेळी आमचे 100 नगरसेवक होते. त्यापैकी 75-80 जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या निवडणुकीत आम्ही शहरात काम करण्याऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे असं पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे लेट्सअप मराठीशी बोलताना म्हणाले.

follow us