Download App

Video : “ठुमका लगाओ नहीं तो सस्पेंड कर देंगे”, लालूपुत्राचा आदेश अन् नाचला पोलीस; व्हिडिओ व्हायरल

बिहारचे माजी (Bihar Politics) मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bihar Politics : बिहार राज्यात शनिवारी होळीचा सण (Holi Celebration) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी अन् राजकारणी मंडळी सगळ्यांनीच रंगांची मुक्त उधळण केली. परंतु, या सगळ्या उत्सवात बिहारचे माजी (Bihar Politics) मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बिहारमधील सत्ताधारी भाजप आणि जेडीयूने यादव कुटुंबियांवर घणाघाती टीका केली. बिहारमधून जंगलराज संपलंय पण लालू यादवांचे युवराज एका पोलीस कर्मचाऱ्याला धमकावत आहेत असा दावा जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी केला आहे.

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आमदार तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या निवासस्थान परिसरातील आहे. तेजप्रताप रंगांत रंगलेले दिसत आहेत. त्यांचे कार्यकर्ते आणि मित्रमंडळी येथे हजर आहेत. याच दरम्यान तेजप्रताप यादव त्यांच्या खास स्टाइलमध्ये एका पोलिसाला जवळ बोलावतात आणि त्याला डान्स करायला सांगतात.

तेजप्रताप या पोलिसाला आवाज देऊन म्हणतात ए शिपाई, ए दीपक.. मी एक गाणे वाजवतो त्या गाण्यावर तुला नृत्य करावं लागेल. तेजप्रताप यांचे बोल ऐकताच उपस्थित सर्व हसू लागतात. बुरा ना मानो होली है, जर नाचता आलं नाही तर तुला सस्पेंड केले जाईल असा इशारा देताच हा पोलीस नाचतो आणि तेजप्रताप यादव स्वतः गाणे म्हणताना व्हिडिओत दिसत आहेत.

जंगलराज संपलंय पण लालूंचे युवराज..

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील राजकारण ढवळून निघाले. सत्ताधारी भाजप आणि जेडीयूने तेजप्रताप यादव आणि आरजेडीवर घणाघाती टीका केली. बिहारमधून जंगलराज संपलंय पण लालू यादवांचे युवराज एका पोलीस कर्मचाऱ्याला धमकावत आहेत असा दावा जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी केला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा म्हणाले राजदची संस्कृती म्हणजे कायद्याची अवहेलना, संवैधानिक पदांवरील व्यक्तींची चेष्टा करणे हीच आहे. त्यांच्याकडून राज्यातील जनतेचा वारंवार अपमान केला जात आहे.

काय सांगता? बिहारचं बजेट जगातील 150 देशांच्या GDP पेक्षा जास्त, सविस्तरच वाचा

तेजप्रताप यादव यांनी आपल्या बॉडीगार्डला नाचण्यासाठी सांगितलं. जर नाचला नाही तर सस्पेंड करण्याची धमकीही दिली. पण तेजप्रताप यांच्याकडे त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. नितीशकुमार यांचं सरकार आहे. जंगलराज नाही. अशा भाषेचा उपयोग खरंच दुर्भाग्यपूर्ण आहे अशा शब्दांत भाजप नेते शाहनवाज हुसैन यांनी तेजप्रताप यांच्यावर टीका केली.

follow us