Bihar CM Nitish Kumar Announced New Working Committee : लोकसभा निवडणुकीच्या आधी बिहारच्या (Lok Sabha Election 2024) राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ललन सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Bihar Politics) दिल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी कमान आपल्या हाती घेतली. त्यानंतर निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांना जदयू (JDU) राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार आणि नितीश कुमार यांचे विश्वासू केसी त्यागी यांना सल्लागार आणि राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती दिली आहे.
जनता दल (यूनाइटेड) की राष्ट्रीय कार्यकारिणी के नवनियुक्त सभी पदाधिकारियों को हार्दिक बधाई।#Congratulations #JDU #Bihar #NitishKumar pic.twitter.com/Eeek4yWimH
— Janata Dal (United) (@Jduonline) January 20, 2024
नितीश कुमार यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये 22 पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. खासदार आलोक सुमन यांना कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजीव रंजन यांना राष्ट्रीय प्रवक्तेपद देण्यात आले. रामनाथ ठाकूर, संजय झा, मंगनीलाल मंडल, अली अशरफ फातमी, अफाक अहमद खान, भगवन सिंह कुशवाहा, रामसेवक सिंह, कहकशा प्रविण, कपिल हरिश्चंद्र पाटील, राज सिंह मान, इंजिनिअर सुनील यांना पक्षाचे महासचिव म्हणून नेमणूक देण्यात आली.
या कार्यकारिणीत सहा नेते असे आहेत ज्यांना राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी मिळाली आहे. यामध्ये विद्यासागर निषाद, राजीव रंजन प्रसाद, अनुप पटेल, दयानंद राय, संजय कुमार आणि निसार यांचा समावेश आहे. बिहार सरकारमधील एकमेव मंत्री संजय झा यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळाली आहे.
Nitish Kumar : काँग्रेसची गुगली अन् ममतांचा डाव! संयोजकानंतर PM पदाच्या शर्यतीतूनही नीतीशकुमार OUT
दरम्यान, याआधी दिल्लीतील पक्षाच्या बैठकीत ललन सिंह यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेतली. सन 2003 पासून आतापर्यंत नीतीश कुमार पाचव्यांदा जनता दल संयुक्तचे (जेडीयू) अध्यक्ष बनले. सर्वात आधी सन 2016 मध्ये शरद यादव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर नीतीश कुमार अध्यक्ष झाले होते. नीतीश कुमार यांच्यानंतर आरसीपी सिंह यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आरसीपी सिंह यांच्यानंतर लल्लन सिंह राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. आता मात्र लल्लन सिंह राजीनामा देण्याच्या मानसिकतेत नव्हते. मला बाजूला केले तर इंडिया आघाडीत चुकीचा संदेश जाईल असे त्यांचे म्हणणे होते. मात्र पक्षातील अन्य नेत्यांनी नीतीश कुमार हेच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत असे वाटत असल्याने लल्लन सिंह यांना अध्यक्षपद सोडावे लागले.