Download App

मोठी बातमी! बिल्किस बानो प्रकरणात सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, पुनर्विचार याचिका फेटाळली

Bilkis Bano Case :  बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला मोठा धक्का देत पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.  तसेच

  • Written By: Last Updated:

Bilkis Bano Case :  बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला मोठा धक्का देत पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.  तसेच या प्रकरणातील दोषींच्या सुटकेशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील टिप्पणी काढून टाकण्यास देखील न्यायालयाने नकार दिला आहे.

काही दिवसापूर्वी गुजरात सरकारच्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने केलेली टिप्पणी काढून टाकण्यासाठी गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे गुजरात सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.

गुजरात सरकारने आपल्या याचिकेत म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते गुजरात सरकारने मिळवून आणि दोषींशी संगनमत करून या प्रकरणात काम केले अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात केली होती. त्यामुळे न्यायालयाची ही टिप्पणी केवळ अयोग्य नसून खटल्याच्या रेकॉर्डच्या विरोधात आहे असेही या याचिकेत गुजरात सरकारने म्हटले होते.

follow us