Kangana Ranaut : बिल्किस बानोवर कंगना घेऊन येतीय चित्रपट, स्क्रिप्ट देखील तयार

Kangana Ranaut : बिल्किस बानोवर कंगना घेऊन येतीय चित्रपट, स्क्रिप्ट देखील तयार

Bilkis Bano case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिने सोशल मीडियावर मोठा खुलासा केल्याने पुन्हा चर्चेत आलीय. कंगना राणौतने सांगितले की तिला गुजरातमधील गँगरेप पीडित बिल्किस बानोच्या (Bilkis Bano case) जीवनावर चित्रपट बनवायचा आहे. ती अनेक वर्षांपासून चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. बिल्किस बानोवर चित्रपट बनवण्यासाठी तिने अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मशी संपर्क साधला होता पण तिला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

चित्रपटाची स्क्रिप्ट तयार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका युझर्सने कंगना रणौतला टॅग केले आणि लिहिले की कंगना रणौत मॅडम, महिला सशक्तीकरणाची तुमची आवड खूप उत्साहवर्धक आहे. तुम्हाला बिल्किस बानोच्या कथेवर एक दमदार चित्रपटात करायला आवडेल का?

यावर उत्तर देताना कंगना रणौतने लिहिले की, मला एक कथा बनवायची आहे. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे. मी त्यावर तीन वर्षे संशोधन आणि काम केले आहे. पण टॉप ओटीटी प्लॅटफॉर्मकडून प्रतिसाद मिळत नाहीये, असे कंगनाने सांगितले.

OTT प्लॅटफॉर्म प्रतिसाद देत नाहीत?
कंगना रणौतने पुढे लिहिले की, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम इंडिया आणि इतर स्टुडिओ यांनी मला सांगितले की त्यांचे गाईडलाईन्स असे आहेत की ते तथाकथित राजकीयदृष्ट्या प्रेरित चित्रपट बनवत नाहीत. जिओ सिनेमाने म्हटले आहे की आम्ही कंगनासोबत काम करत नाही कारण ती भाजपला समर्थन देते आणि झी विलीनीकरणातून जात आहे. आता माझ्याकडे काय पर्याय आहेत? असे तिने म्हटले आहे.

कोर्टात गेल्याने माझ्यावर दबाव येणार नाही, राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला खडसावले

इमर्जन्सी रिलीज होण्याची प्रतिक्षा
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर कंगना राणौत शेवटची ‘तेजस’ चित्रपटात दिसली होती. मात्र, 2023 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता कंगना राणौत तिचा नवीन चित्रपट ‘इमर्जन्सी’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे.

IND Vs ENG: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज, स्टार सलामीवीराचे पुनरागमन निश्चित

हा चित्रपट यापूर्वी 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार होता पण नंतर तो पुढे ढकलण्यात आला. आता हा चित्रपट या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यामध्ये कंगना राणौतने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिनेच केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube