कोर्टात गेल्याने माझ्यावर दबाव येणार नाही, राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला खडसावले
ShivSena MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला आहे. या भेटीविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. कोर्टात जाण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण कोर्टात जाऊन माझ्यावर दबाव पडणार नाही. मी जे करत आहे ते कायदेशीर आहे. कुठंही कायद्यांच्या तरतूदींची मोडतोड झाली नाही. माझा निर्णय कायद्याला धरुन असेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबई विमानतळावर आज सकाळी जयंत पाटील आणि अनिल देसाई यांना भेट झाली मग ते भेट देखील हेतुपूर्वक होती का? भेट झाल्यावर चर्चा होतच असते. गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल आहे त्यापैकी एकही मला भेटला नाही का? प्रत्येक आठवड्यात सुनिल प्रभु भेटले, अजय चौधरी येऊन भेटले. म्हणजे मी ह्यांना कोणालाच भेटायचे नाही का? असा सवाल राहुल नार्वेकर यांनी केला आहे.
…म्हणून पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण…
जेव्हा बिनबुडाचे आरोप केले जातात. त्यावेळेला केवळ जो व्यक्ती निर्णय घेत असतो त्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात. पण मला जनतेला सांगायचं आहे की मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतूदींच्या आधारवर, 1986 चे जे नियम आहे त्या आधारावर आणि विधीमंडळाचे जे पायंडे आहे, त्या प्रथा परंपरांचा विचार करुन अत्यंत कायदेशीर दृष्ट्याने असेल. त्यातून राज्यातील जनतेला न्याय भेटलं, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
काँग्रेस नेते सुनिल केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत नागपूर खंडपीठाने जामीन दिला आहे. आता त्यांची आमदाराकी पुन्हा बहाल केली जाणार का? यावर नार्वेकर म्हणाले, या संदर्भात माझ्याकडे कोणतीही माहिती आलेली नाही. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर अभ्यास करुन निर्णय घेईन.