गॅब्रिएल अटल ठरले फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान
France new pm : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी गॅब्रिएल अटल (Gabriel Atal) यांची पंतप्रधानपदी नियुक्ती (France new pm) केली आहे. 34 वर्षीय गॅब्रिएल हे फ्रान्सचे पंतप्रधान बनणारे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी व्यक्ती आहेत. ते सध्या मॅक्रॉन सरकारमध्ये शिक्षणमंत्री पद सांभाळत आहेत.
गॅब्रिएल यांनी उघडपणे ते गे असल्याचे सांगितले आहे. गॅब्रिएल हे एलिझाबेथ बॉर्न यांची जागा घेणार आहेत. इमिग्रेशनमुळे अलीकडेच उद्भवलेल्या राजकीय तणावामुळे एलिझाबेथ बॉर्न यांनी सोमवारी (8 जानेवारी) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
एलिझाबेथ बॉर्न यांनी मे 2022 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या युरोपीय निवडणुकांपूर्वी त्यांचा राजीनामा आला आहे. अशा परिस्थितीत त्यांचा राजीनामा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मॅक्रॉन यांनी एलिझाबेथ बोर्नोबद्दल सांगितले होते की, त्यांनी आपल्या कार्यकाळात धैर्य, वचनबद्धता आणि दृढनिश्चय दाखवला.
इमॅन्युएल मॅक्रॉन काय म्हणाले?
इमॅन्युएल मॅक्रॉनने फ्रेंचमध्ये सोशल मीडियावर लिहिले X: प्रिय गॅब्रिएल अटल, तू तुझ्या उर्जेने आणि ध्यासाने मी जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी करशीला याचा विश्वास आहे.
कोर्टात गेल्याने माझ्यावर दबाव येणार नाही, राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला खडसावले
त्यांनी कोणती पदे भूषवली?
वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, गॅब्रिएल अटल हे सोशलिस्ट पार्टीचे सदस्य राहिले आहेत. ते 2016 मध्ये मॅक्रॉन यांच्यासोबत पक्षात सामील झाले. त्यानंतर 2020 ते 2022 पर्यंत सरकारचे प्रवक्ते होते. जुलै 2023 मध्ये शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी अटल अर्थसंकल्पीय मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत होते. अलीकडील अनेक जनमत चाचण्यांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की मॅक्रॉन सरकारमध्ये गॅब्रिएल अटल यांना सर्वाधिक पसंती आहे.