अर्थव्यवस्था, नोकरी अन् सुरक्षा, एआय समिटमध्ये मोदींनी दिला ‘गुरुमंत्र’
![अर्थव्यवस्था, नोकरी अन् सुरक्षा, एआय समिटमध्ये मोदींनी दिला ‘गुरुमंत्र’ अर्थव्यवस्था, नोकरी अन् सुरक्षा, एआय समिटमध्ये मोदींनी दिला ‘गुरुमंत्र’](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/PM-Modi-On-AI-Summit_V_jpg--1280x720-4g.webp)
PM Modi On AI Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (11फेब्रुवारी) फ्रान्सच्या दौऱ्यावर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्यासोबत एआय ॲक्शन समिटचे (AI Summit) अध्यक्षपद भूषवले. या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी एआय इतर तंत्रज्ञानापेक्षा वेगळा आहे. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाही पण या पासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. असं या शिखर परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या शिखर परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एआय खूप वेगाने विकसित होत आहे. भविष्यासाठी एआय खूप उपयुक्त असणार आहे. भारत एआयचा अवलंब करण्यात आणि डेटा गोपनीयतेसाठी तांत्रिक-कायदेशीर पाया तयार करण्यातही पुढे आहे. भारत सार्वजनिक हितासाठी एआय अॅप्लिकेशन्स विकसित आहे. भारताने आपल्या 1.4 अब्जाहून अधिक लोकांसाठी अतिशय कमी खर्चात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यशस्वीरित्या निर्माण केल्या आहेत. एआयशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला जागतिक मानकांची आवश्यकता आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि त्याचे सह-अध्यक्ष म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानतो. एआय आपली अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि अगदी आपल्या समाजालाही आकार देत आहे. या शतकात एआय मानवतेसाठी कोड लिहित आहे. असेही मोदी म्हणाले.
तसेच आपण आपली संसाधने आणि प्रतिभा एकत्र आणली पाहिजे आणि विश्वास आणि पारदर्शकता वाढवणाऱ्या ओपन सोर्स सिस्टम विकसित केल्या पाहिजेत. आपण सायबर सुरक्षा, चुकीची माहिती आणि डीप फेकशी संबंधित चिंता दूर केल्या पाहिजेत. असं देखील ते म्हणाले.
25 लाख महिलांना करणार ‘लखपती दीदी’ ; CM फडणवीसांची मोठी घोषणा
नोकरी जाणार नाही
आज एआयबद्दलची सर्वात मोठी भीती म्हणजे नोकऱ्या जाण्याची भीती, परंतु इतिहासाने हे दाखवून दिले आहे की तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जात नाही. काळानुसार नोकऱ्यांचे स्वरूप बदलते आणि नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. भविष्यासाठी आपल्या लोकांच्या कौशल्यांमध्ये आणि पुनर्कौशल्यांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. असं देखील या शिखर परिषदेमध्ये मोदी म्हणाले.