Download App

BJP Candidate List : वरुण गांधींचा पत्ता कट, मनेका गांधींना ‘या’ मतदारसंघातून मिळाली उमेदवारी

  • Written By: Last Updated:

BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी आज भाजपची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या 111 उमेदवारांच्या यादीत भाजपने कंगना रणौत  (Kangana Ranaut) उमेदवारी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीमधून कंगना रणौत उमेदवारी देण्यात आली आहे. तर अनेकांचा पत्ता कट करण्यात आला. तर भाजपने अनेकांचा पत्ता कट करत इतरांना संधी दिली. भाजपने वरूण गांधी (Varun Gandhi) यांचा पत्ता केला असून  मनेका गांधी (Maneka Gandhi) यांना उमेदवारी दिली आहे.

BJP Candidate List : अभिनेत्री कंगना राणावत हिची अखेर राजकारणात एंट्री, भाजपने दिली लोकसभेची उमेदवारी 

गाझियाबादमधून व्हीके सिंग यांच्याजागी अतुल गर्ग यांना उमेदवारी देण्यात आली. तर पीलीभीतमधून वरुण गांधी यांचा पत्ता कट करत जितिन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली. मनेका गांधी यांनाही तिकीट नाकारले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिले आहे.

या यादीत भाजपने उत्तर प्रदेशातील 13 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने बरेली, बदाऊन आणि पिलीभीतसह आठ खासदारांची तिकिटे कापली आहे. त्यांच्या जागी इतरांना संधी देण्यता आली. भाजपने ज्यांची तिकिटे कापली त्यात संतोष गंगवार, वरुण गांधी, संघमित्रा मौर्य, राजेंद्र अग्रवाल, सत्यदेव पचौरी, अक्षयवर लाल गोंड, उपेंद्र सिंह रावत आणि राजवीर दिलार यांचा समावेश आहे. वरुण गांधी यांच्यावर पक्षविरोधी धोरणे राबवल्याचा आरोप आहे. संतोष गंगवार यांना त्यांचे वय लक्षात घेऊन तिकीट देण्यात आले नाही.

Lok sabha Election : सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेविरुद्ध राम सातपुते ‘रणसंग्राम’, भाजपची दुसरी यादी 

मनेका गांधी सुलतानपूरमधून लढणार
भाजपने सहारनपूरमधून राघव लखनपाल, गाझियाबादमधून अतुल गर्ग, बदायूंमधून दुर्गविजय सिंह शाक्य, मुरादाबादमधून सर्वेश सिंग, मेरठमधून अरुण गोविल, बरेलीमधून छत्रपाल गंगवार, पीलीभीतमधून जितिन प्रसाद, सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. . कानपूरमधून सतीश गौतम, बहराइचमधून अरविंद गोंड, बाराबंकीमधून राजरानी रावत, हाथरसमधून अनूप वाल्मिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कंगणा मंडीतून तर गोविल मेरठमधून लढणार
भाजपने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्र, हरियाणातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अरुण गोविल यांनाही तिकीट देण्यात आले आहे. अरुण गोविल मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत.

महाराष्ट्रातीतून तिघांना उमेदवारी जाहीर
याशिवाय, भाजपने महाराष्ट्रातून तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सुनील मेंढे यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. यासोबतच भाजपने गडचिरोली-चिमूरमधून अशोक महादेवराव नेते आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

follow us

वेब स्टोरीज