Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) निकाल येण्यास अवघे काही तास शिल्लक राहिलेत. एक्झिट पोलमध्ये (Exit polls) देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. एक्झिट पोलच्या कलाने उत्साहित झालेल्या भाजपने नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मोठा राजकीय कार्यक्रम आखल्याचे वृत्त समोर येत आहे.
कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने विचारांना नवी उंची; निकालाच्या एक दिवस आधी PM मोदींची पोस्ट
एक्झिट पोलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एनडीएला जवळपास 350 ते 400 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालाआधी भाजपने जल्लोषाची तयारी सुरू केलीये. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो आयोजित केला जाणार आहे. यात भाजपचे लाखो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून हा रोड शो पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजप कार्यालयापर्यंत असणार आहे.
टीम इंडियाचा सुपर फिनिशर केदार जाधवने धोनी स्टाईलने जाहीर केली निवृत्ती
या आठवड्याच्या शेवटी राजधानी दिल्लीत हा कार्यक्रम होऊ शकतो. इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अधिकृत शपथविधीच्या दिवशी हा राजकीय कार्यक्रम भारत मंडपम किंवा कर्तव्य पथावर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. हे ‘भारताच्या सांस्कृतिक ठेवा’ या थीमवर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्यात कदाचित म्युझिक शो आणि प्रकाश शोचा समावेश असणार आहे. परदेशी सरकारच्या प्रतिनिधींसह 8 ते 10 हजार लोक यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शपथविधी समारंभानंतरच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची योजना अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु ती 9 जून रोजी होऊ शकते.
शपथविधीची तयारी सुरू
राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी गेल्या आठवड्यापासून सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभआग या कार्यक्रमाची तयारी करत आहे. त्याचवेळी, लोकसभा सचिवालय देशभरातील नवनिर्वाचित खासदारांचा प्रवास, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर त्यांचे आगमन आणि राजधानीत राहण्याची सोय करण्याची तयारी करत आहे.