Download App

राहुल गांधींचा अमेरिका दौरा भाजपच्या रडारवर; ‘तो’ फोटो दाखवत स्मृती इराणींचा हल्लाबोल

Smriti Irani On Rahul Gandhi :  भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत जॉर्ज सोरोसचे लोक का होते असा प्रश्न उपस्थित केला. सोरोस हे भारताच्या विरोधात काम करतात हे माहित असून देखील राहुल गांधी त्यांच्या लोकांसोबत फिरत असल्याचे भाजपने म्हटले आहे.

भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. या परिषदेमध्ये त्यांनी एक फोटो सादर केला आहे. याफोटोत राहुल गांधींसोबत अन्य काही लोक बसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये एक महिला देखील होती. इराणी यांनी त्या महिलेचे नाव सुनीता विश्वनाथ असे सांगितले. सुनीता यांना उद्योगपती सोरोस यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात येते, असा आरोप इराणींनी केला आहे. अशा लोकांसोबत राहुल गांधी काय करत होते, असा प्रश्न इराणी यांनी विचारला आहे.

‘सडक्या बुद्धीजीवींनो मेसेज डिलीट करा’…म्हणून पुण्यातील तरूणीला वाचवणारा लेशपाल संतापला…

भाजपने यापूर्वीही हा मुद्दा उपस्थित केला असल्याचे त्या म्हणाल्या. सोरोस यांना भारतातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार कसे हटवायचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सोरोसचे हेतू प्रत्येक भारतीयाला माहीत असताना, राहुलने सोरोसच्या सहाय्यकासोबत बैठकीला हजेरी लावण्याची कोणती सक्ती होती, असेही त्या म्हणाल्या.

इराणी पुढे म्हणाल्या की, सार्वजनिक डोमेन इंटरनेटवर राहुल गांधींच्या 4 जूनच्या न्यूयॉर्क सभेच्या नोंदणीसाठी दिलेल्या व्यक्तीचे नाव आणि नंबरचा इस्लामिक सर्कल ऑफ नॉर्थ अमेरिकेशी संबंध असल्याचे आढळून आले. या संघटनेच्या संदर्भात, 28 फेब्रुवारी 2019 रोजी, यूएस काँग्रेस अर्थात प्रतिनिधी सभागृहात एका ठरावात म्हटले आहे की, तिचा जमात-ए-इस्लामीशी संबंध आणि संपर्क आहे. त्यामुळे त्यांची मदत घेण्याची गरज का आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

PM Modi on UCC : पीएम मोदींनी साधलं टायमिंग; म्हणाले, एका देशात दोन कायद्यांचं…

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. काँग्रेस नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर अमित मालवीय यांच्याविरुद्ध बेंगळुरूमधील हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us