Rajasthan : मोदी शाहंच्या मनाचा अंदाज लागेना; पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा थेट CM

Bhajanlal Sharma New Chief Minister of Rajasthan : राजस्थान विधानसभेच्या एकहाती विजयानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. अखेर हा पेज सुटला असून भाजपने पुन्हा सरप्राइज देत मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्या नावची घेषणा केली आहे. शर्मा यांच्या नावासोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली असून, दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार […]

Letsupp Image   2023 12 12T162055.559

Letsupp Image 2023 12 12T162055.559

Bhajanlal Sharma New Chief Minister of Rajasthan : राजस्थान विधानसभेच्या एकहाती विजयानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. अखेर हा पेज सुटला असून भाजपने पुन्हा सरप्राइज देत मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्या नावची घेषणा केली आहे. शर्मा यांच्या नावासोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली असून, दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार आहे. तर, वासुदेव देवनानी विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यात प्रामुख्याने वसुंधरा राजे यांच्याशिवाय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गजेंद्र सिंह शेखावत, सतीश पुनिया आणि राजकुमारी दिया यांची नावे आघाडीवर होती. मात्र, भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा झाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, मध्य प्रदेश, छत्तीसगड नंतर आता भाजपने राजस्थानातही सरप्राइज दिले आहे.

कोण आहेत भजनलाल शर्मा

भजनलाल शर्मा हे भरतपूर येथील रहिवासी असून, ते अनेक दिवसांपासून संघटनेत प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. भाजपने त्यांना प्रथमच जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून निवडणूक लढवायला लावली होती. यात त्यांनी विजय मिळवला आणि आता त्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सांगनेर येथील विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापत भजनलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48081 मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला.

Uddhav Thackeray : भुजबळांकडे पेढे तर, पटेलांकडे…; अधिवेशनानंतर ठाकरेंचा प्लॅन ठरला

सांगनेर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पहिल्याच प्रयत्नात शर्मा यांनी विजय मिळवल्याने आणि संघटनेतील त्यांची महत्त्वाची भूमिका पाहता त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या भजनलाल शर्मा यांनी एप्रिलमध्येच राजस्थानात भाजपच्या विजयाची घोषणा केली होती. भजनलाल शर्मा हे राजस्थान विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर असून, 1993 मध्ये त्यांनी राजकारणात एम.ए.ची पदवी घेतली आहे.

बाहेरचे असल्याचा काँग्रेसकडून आरोप 

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने भरतपूरचे रहिवासी असलेल्या भजनलाल शर्मांवर ते बाहेरचे असल्याचा आरोप केला होता. बाहेरच्या उमेदवाराला मतदान न करता त्यांना पराभूत करण्याचे आवाहन काँग्रेसने सांगानेरच्या जनतेकडे केली होती. मात्र, काँग्रेसच्या या आवाहनाला न मानता या जागेवरून भजनलाल शर्मा यांनी मोठा विजय नोंदवला.

Exit mobile version