Download App

जेपी नड्डा यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश, कॅनिबेट मंत्रिपदाची घेतली शपथ

भाजप नेते जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

JP Nadda Cabinet Minister : भाजप नेते जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनियतेच शपथ दिली.

NDA Cabinet : राजनाथ सिंह, अमित शाहांनतर ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मोदीनंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांच्यानंतर जेपी नड्डा यांनी शपथ घेतली. जेपी नड्डा हे पेशाने वकील आहेत. 20 जानेवारी 2020 पासून ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याआधी ते जून 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत भाजपचे कार्याध्यक्ष होते. ते भारतीय जनता पक्षाचे संसदीय मंडळ सचिव राहिले आहेत. यापूर्वी ते हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्रीही होते. नड्डा हे माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते.

Nitin Gadkari Oath : नितीन गडकरींनी तिसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ 

नड्डा यांचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे झाला. जेपी नड्डा यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेवियर्स स्कूलमधून झाले. त्यानंतर यानंतर त्यांनी पाटना विद्यापीठातून बी.ए.चे शिक्षण घेतले. पुढ त्यांनी शिमला येथील हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीमधून एलएलबी केले. नड्डा यांनी 11 डिसेंबर 1991 रोजी मल्लिका नड्डा यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या सासू जयश्री बॅनर्जी 1999 मध्ये लोकसभेवर निवडून आल्या होत्या.

नड्डा यांच्यानंतर कोण होणार भाजप अध्यक्ष?
दरम्यान, जगत प्रकाश नड्डा मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात सामील झाल्यानं त्यांना पक्षाध्यक्षपद निश्चितच सोडावे लागणार आहे. नड्डा यांच्यानंतर आता भाजपच्या नूतन अध्यक्षांच्या नावावरून चर्चा सुरू झाली आहे. कालपर्यंत काही नावे समोर येत होती – त्यात भूपेंद्र यादव, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल आणि धर्मेंद्र प्रधान प्रमुख होते. पण मोदी मंत्रिमंडळात भूपेंद्र यादव, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल आणि धर्मेंद्र प्रधान यांनीही शपथ घेतली. त्यामुळे हे सर्व लोकही शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us

वेब स्टोरीज