बिहारमध्ये ‘व्होट चोरी’? भाजपचे माजी खासदार राकेश सिन्हांकडून 10 महिन्यांत दोन ठिकाणी मतदान

Rakesh Sinha : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान पार

Rakesh Sinha

Rakesh Sinha

Rakesh Sinha : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले आहे. बिहारच्या जनतेने पहिल्या टप्प्यातील मतदानाला मोठा प्रतिसाद देत मागील रेकॉर्ड मोडला आहे. तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर देशाच्या राजकारणात भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार राकेश सिन्हा चर्चेत आले आहे. राकेश सिन्हा यांनी फक्त 10 महिन्यांत दोन ठिकाणी मतदान केला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

भाजपचे माजी खासदार राकेश सिन्हा (Rakesh Sinha) यांनी आधी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तर आता बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Elections) मतदान केला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. बेगुसराय येथील मानसेरपूर (साहेबपूर कमल विधानसभा मतदारसंघ) या त्यांच्या मूळ गावी मतदान केल्यानंतर राकेश सिन्हा यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली मात्र यानंतर आरजेडी आणि काँग्रेसने भाजपवर टीका करत व्होट चोरीचा आरोप केला आहे.

आप (AAP), काँग्रेस (Congress) , आरजेडीने (RJD) दावा केला आहे की, माजी खासदार राकेश सिन्हा यांनी व्होट चोरी केली आहे. याबाबत पुरावा देत विरोधी पक्षाकडून राकेश सिन्हा यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आणि बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदानाची फोटो व्हायरल करण्यात येत आहे. या फोटोमध्ये राकेश सिन्हा यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली विधानसभा निवडणुकीत द्वारका मतदारसंघात मतदान करताना दाखवण्यात आले. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनाते यांनी थेट प्रश्न विचारला, “ही कोणत्या योजनेअंतर्गत राबविली जात आहे?”

दिल्ली आपचे प्रमुख सौरभ भारद्वाज यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचारवंत असूनही, राकेश सिन्हा नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असल्याची टिप्पणी केली. सौरभ भारद्वाज म्हणाले की, राकेश सिन्हा हे दिल्ली विद्यापीठाच्या मोतीलाल नेहरू कॉलेजमध्ये शिकवतात, त्यामुळे त्यांचे प्राथमिक पत्ता दिल्लीत असावे.

मानहानीचा खटला दाखल करावा का? : माजी खासदार राकेश सिन्हा

तर दुसरीकडे माजी खासदार राकेश सिन्हा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि म्हटले की त्यांनी दिल्लीहून त्यांचे मतदार कार्ड बिहारमधील बेगुसराय येथील मानसपूर या त्यांच्या गावी हस्तांतरित केले आहे. मी कधीच कल्पना केली नव्हती की राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते. संविधानाचा आदर करणाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी बोलण्यापूर्वी दोनदा विचार करावा.

माझे नाव पूर्वी दिल्लीच्या मतदार यादीत होते, परंतु आता मी बिहारच्या राजकारणात सक्रिय असल्याने मी ते माझ्या गावात हस्तांतरित केले. या खोट्या आरोपाविरुद्ध मी मानहानीचा खटला दाखल करावा का? असं त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version