BJP Leader Surendra Kewat Shot Dead Bihar : भाजप (BJP) पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. ही घटना बिहारच्या (Bihar) पाटणामध्ये घडली. भाजपाशी संबंधित दुसऱ्या पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या झाल्याने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शेखपुरा गावातील भाजप पदाधिकारी सुरेंद्र केवट यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार (Crime News) केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 4 जुलै रोजी पाटण्यात व्यावसायिक गोपाल खेमका यांच्या हत्येनंतर अवघ्या काही दिवसांत घडल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दुचाकीस्वारांनी झाडल्या गोळ्या
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र केवट हे बिहटा-सरमेरा महामार्गालगत असलेल्या त्यांच्या शेतावर पाण्याचा पंप बंद करण्यासाठी गेले असताना, परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत केवट यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा (Surendra Kewat Shot Dead) मृत्यू झाला.
भाविकांनो लक्ष द्या! तुळजाभवानी मंदिर आता फक्त 19 तास खुलं, वेळेची मर्यादा…
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर पशुवैद्यक आणि शेतकरी म्हणून परिचित असलेले सुरेंद्र केवट हे भाजपाचे सक्रिय पदाधिकारी होते.
उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती; संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता भूमिका काय? म्हणाले…
भाजप पदाधिकाऱ्यांची सर्रास हत्या
या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सत्ताधारी एनडीए सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत विचारलं की, “राज्यात भाजप पदाधिकाऱ्यांची सर्रास हत्या होत आहे, पण सरकार आणि त्यातील मंत्री मौन बाळगून आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची माहिती सगळ्यांना आहे, पण भाजपचे दोन उपमुख्यमंत्री काय करत आहेत?
तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. सध्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरु केला आहे, तर प्रशासनाने तपास जलद गतीने सुरू असल्याचे सांगितले आहे.