Download App

Loksabha Election : 400 पार सोडाच भाजप 250 च्या आतच! योगेंद्र यादवांचा मोठा दावा….

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला 233 जागा तर मित्र पक्षांच्या मिळून एनडीएला 268 जागा मिळतील असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे.

Loksabha Election : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलंय. निवडणुकीत अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी एकीकडे सत्ताधारी एनडीए (NDA) तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांकडून चांगलीच कंबर कसल्याचं दिसून आलंय. भाजपने 400 चा पार नारा दिलाय. तर इंडिया आघाडीकडून भाजप तडीपार होणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे देशात कोणत्या पक्षाचा पंतप्रधान बनणार हे सांगणं अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे. अशातच आता राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी पडद्यामागचं समीकरण मांडलंय. त्यात भाजप नेतृत्वाखालील एनडीए आघाडीही बहुमतापासून दूर राहील. तर इंडिया आघाडी बहुमताजवळ जाईल.परंतु स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा दावा यादव हे करीत आहेत. निवडणुकीच्या निकालात भाजपला 233 जागा तर मित्र पक्षांच्या मिळून एनडीएला 268 जागा मिळतील असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे. त्यामुळे भाजपला बहुमत मिळत नसल्याचा दावा त्यांनी केलायं.

Tanvi The Great च्या दिग्दर्शकासाठी अनुपम खेर यांची खास पोस्ट; म्हणाले तो सर्वात कठोर पण…

योगेंद्र यादव यांच्या विश्लेषणानुसार, 2019 साली भाजपचे 303 खासदार निवडून आले. तर मित्रपक्षांमुळे भाजप 353 खासदारांमुळे बहुमतात आहे. यंदाच्या निवडणुकीत एनडीएला 100 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात भाजपला 75 तर मित्रपक्षांना 25 जागांचा फटका बसण्याची शक्यता यादव यांनी वर्तवलीयं.

भाजपला 100 जागांवर फटका बसणार :
कर्नाटकात भाजपने 28 पैकी 26 जागा लढवल्या आहेत. येथे भाजपला 10 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात भाजपच्या 10 जागा कमी होणार असल्याची शक्यता आहे. तसेच राजस्थान आणि गुजरातमध्ये 51 पैकी 51 जागा भाजपकडेच आहे. दोन्ही राज्यांत मिळून त्यांच्या 10 जागा कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हरयाणा, पंजाब, चंदीगढ, हिमाचल प्रदेश, दिल्ली या राज्यांच्या मिळून एकूण 10 जागा कमी होणार असल्याची शक्यता आहे.

तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्येही 10 जागा कमी होणार असून 2019 साली उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला 69 जागा मिळाल्या होत्या, तर या निवडणुकीत 15 जागा कमी होणार आहेत. बिहारमध्ये भाजप 40 पैकी 39 जागा लढवत आहेत. त्यापैकी 15 जागा भाजपच्या हातातून जाणार असल्याचं यादव यांनी स्पष्ट केलंय. पश्चिम बंगाल, उत्तर पूर्व, आणि केंद्रशासित प्रदेशासित राज्यांत एकूण 10 जागा कमी होणार आहेत. त्यामुळे भाजप आपल्या ताब्यात असलेल्या 75 जागा गमावणार असल्याचा दावा यादव यांनी केलायं. तर मित्र पक्षांच्याही 25 जागा कमी होणार आहेत.

Happy Birthday : एमबीबीएस, मिस वर्ल्ड अन् अभिनेत्री; मानुषीच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक

‘या’ राज्यांत भाजपला 15 जागांचा फायदा होणार :
देशातील काही राज्यांत भाजपकडे असलेल्या जागा हातातून निसटणार असल्याचं बोललं जात असतानाच काही जागांवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा दावाही केला जात आहे. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा राज्यात भाजपला 5 जागा अधिक मिळण्याची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेशात टीडीपीसोबत युती असल्याने एकूण 10 जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही राज्यांत फायदा तर काही राज्यांत नुकसान होणार असल्याची शक्यता यादव यांनी वर्तवलीयं.

दरम्यान, एकंदरीत भाजपचं 65 जागांचं नुकसान होणार आहे. तर मित्र पक्षांना 15 जागांचा फटका बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता भाजपकडे 233 जागा आहेत आणि 70 जागांचं नुकसान होणार असल्याची शक्यता आहे तर मित्रपक्षांना 35 जागा मिळणार म्हणजेच 268 जागा एनडीएला जिंकणार असल्याचा दावा योगेंद्र यादव यांनी केलायं.

दरम्यान, देशात सध्या लोकसभेच्या 543 मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधकांना 272 चा आकडा पार पाडावा लागणार आहे. यादवांच्या गणितानुसार एनडीए सत्तेच्या अगदी जवळ असून त्यांना फक्त अवघ्या 4 जागा कमी पडत आहेत. तर दुसरीकडे सर्वत्र देशभरात माध्यमांद्वारे देशात मोदींचीच सत्ता येणार असल्याचं बिंबवलं जातयं, मात्र, ही सत्य परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे, असं योगेंद्र यादवा यांनी स्पष्ट केलंयं.

follow us