इंडिया आघाडी म्हणजे खिचडी, ते संगीत खुर्ची खेळून पंतप्रधान निवडतील; फडणीसांचा टोला

इंडिया आघाडी म्हणजे खिचडी, ते संगीत खुर्ची खेळून पंतप्रधान निवडतील; फडणीसांचा टोला

Devendra Fadnavis Mumbai sabha : आपली पाडंव सेना असून त्याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Prime Minister Narendra Modi) आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींसोबत 24 पक्षांची खिचडी आहे. कारण, इंडिया आघाडीला आपला पंतप्रधान पदाचा चेहराही अजून ठरवता आला नाही. इंडियाची सत्ता आल्यास ते संगीत खुर्ची खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडत बसतील, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी केली.

फडणवीसांचे 50 दिवसांत सभांचे तुफानी शतक ! दोनशेच्या स्टाइक रेटने विरोधकांवर हल्लाबोल 

महायुतीचे उत्तर – मध्य मुंबईचे उमेदवार उज्जल निकम यांच्या प्रचारार्थ आज  मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलतांना फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आज देशात महाभारतासारखे दोन गट पडले. महाभारतात एकिकडे पांडवाची सेना तर दुसरीकडे कौरवांची सेना होती. अनेक राजे पाडवांसोबत होते, अनेक राजे कौरवांसोबत होते. कौरवांची संख्या मोठी होती, पण विजय पाडंवाचा झाला. आज देशातही हीच परिस्थिती आहे. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाई आहे. तर दुसरीकडे कौरवांकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधीसोबत उद्धव ठाकरे शरद पवार आहेत. इंडिया आघाडी २४ पक्षांची खिचडी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

मराठे जातीयवादी असते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले असते का? मनोज जरांगे 

इंडिया आघाडीला आपला पंतप्रधान पदाचा चेहराही ठरवता आली नाही. उबाठाचा भोंगा म्हणतो, आम्ही पाच वर्षात पाच पंतप्रधान देऊ…. इंडियाची सत्ता आल्यास ते संगीत खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडतील. मात्र, ही निवडणूक काही त्यांच्यासाठी काही संगीत खुर्ची आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला.

पाकिस्तानच्या बापाचेही हल्ला करण्याचे धाडस नाही
फडणवीस म्हणाले, पूर्वी आपला देश कसा होता, इथे दहशतवादी यायचे, हल्ले करायचे आणि काँग्रेस सरकार फक्त निषेध करे. मात्र, मोदींनी सत्तेत आल्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. त्यामुळेच 2019 नंतर आपल्या देशावर हल्ला करण्याचे धाडस पाकिस्तानच्या बापालाही झालं नाही, असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंना मुठभर मतांची चिंता…
उद्धव ठाकरेंवर टीका करतांना फडणवीस म्हणाले, काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा काय वाया गेलास तू… आज उद्धव ठाकरे काहीच बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना चिंता फक्त काही मूठभर मतांची आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube