Download App

मणिपूर हिंसाचारात भाजप आमदार जखमी, 500 घरं जळाली

Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला नेण्यात आले आहे.

फिरजावल जिल्ह्यातील थानलॉनचे तीन वेळा आमदार राहिलेले वुंगजागिन वाल्टे हे इम्फाळमधील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जात असताना हा हल्ला झाला. संतप्त जमावाने आमदार आणि त्यांच्या चालकावर हल्ला केला, तर त्यांचा पीएसओ पळून जाण्यात यशस्वी झाला. आमदाराची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर इम्फाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) येथे उपचार सुरू होते. पण आता त्याला एअरलिफ्ट करण्यात आले आहे.” भाजपचे आमदार वाल्टे हे कुकी समाजातील आहेत. मागील भाजप सरकारमध्ये ते मणिपूरचे आदिवासी व्यवहार आणि डोंगरी मंत्री होते.

सीईओंकडून पहिल्याच दिवशी साई संस्थानच्या कारभाराची ‘चिरफाड’, दलालांनी दिली ‘ऑफर’

दुसरीकडे, लष्कराला फ्लॅग मार्चचे आदेश मिळाले आहेत. लष्कर आणि आसाम रायफल्सने चुराचंदपूरच्या खुगा, ताम्पा आणि खोमोजनबा भागात फ्लॅग मार्च काढला. गुरुवारी मंत्रीपुखरी, लामफेल, इंफाळ खोऱ्यातील कोईरंगी भागात आणि ककचिंग जिल्ह्यातील सुग्नू येथे फ्लॅग मार्च काढण्यात आला.

हिंसाचारग्रस्त इम्फाळ खोऱ्यात अस्वस्थ शांतता असूनही शुक्रवारी मणिपूरमधून हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. अहवालानुसार, एकूण 13,000 लोकांना वाचवण्यात आले आणि त्यांना सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आले. सैन्याने चुराचंदपूर, मोरेह, ककचिंग आणि कांगपोकपी जिल्ह्यांचा ताबा घेतल्याने काहींना लष्कराच्या छावण्यांमध्ये हलवण्यात आले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) शुक्रवारी केंद्राला मणिपूरमध्ये संवाद सुरू करण्याची विनंती केली. राज्यात उसळलेला हिंसाचार हा ‘जनतेत फूट पाडण्याच्या’ धोरणाचा परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दंगलग्रस्त मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अमित शाह हे राज्य आणि केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. अमित शाह दिल्लीत आहेत आणि मणिपूरमधील परिस्थितीबद्दल सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांकडून नियमित अपडेट घेत आहेत. शुक्रवारी शांतता होती मात्र वातावरण तणावपूर्ण होते.

Tags

follow us