चावट आमदार… भर सभागृहातच पाहत बसले ‘पॉर्न’

त्रिपुरा : आपल्या मतदार संघाचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी आवर्जून हजेरी लावतात. मात्र नुकताच भाजपच्या एका आमदाराचा चावटपणा समोर आला आहे. हे लोकप्रतिनिधी चालू सभागृहातच पॉर्न व्हिडीओ पाहण्यात मग्न होते. त्यांचा Porn पाहतानाचा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्रिपुरामधील असून जादब लाल नाथ असे या व्हिडीओ पाहणाऱ्या आमदाराचे नाव आहे. जादब […]

Untitled Design   2023 03 30T210048.349

Untitled Design 2023 03 30T210048.349

त्रिपुरा : आपल्या मतदार संघाचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी आवर्जून हजेरी लावतात. मात्र नुकताच भाजपच्या एका आमदाराचा चावटपणा समोर आला आहे. हे लोकप्रतिनिधी चालू सभागृहातच पॉर्न व्हिडीओ पाहण्यात मग्न होते. त्यांचा Porn पाहतानाचा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्रिपुरामधील असून जादब लाल नाथ असे या व्हिडीओ पाहणाऱ्या आमदाराचे नाव आहे. जादब लाल नाथ हे भाजपचे आमदार आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, भाजप आमदार जादब लाल नाथ (Jadab Lal Nath) यांच्या हातात एक टॅब्लेट आहे. यामध्ये ते पॉर्न व्हिडीओ पाहताना स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला जातो आहे. अनेकांनी हे पाहिल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधीवर टीका केली आहे. विधानसभेच्या अधिवेशनात निवडून आलेल्या जबाबदार प्रतिनिधीने असे वागणे हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ त्यांच्या पाठीमागे बसलेल्या आमदारांनी व्हायरल केल्याचे सांगितले जात आहेत. तर काही मीडिया रिर्पोटच्या मते हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

राज्याच्या अर्थसंकल्पात नुसता घोषणांचा सुळसुळाट, मात्र पैसा कोठून आणणार?

भाजपची झाली नाचक्की
त्रिपुरातील (Tripura) बागबासा विधानसभा अधिवेशन सुरू असताना खुर्चीवर बसून भाजप आमदार पॉर्न पाहत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे आमदार तर अडचणीत सापडलेच आहे मात्र त्याचबरोबर भाजपचीही चांगलीच नाचक्की झाली आहे.

Gautami Patil : गौतमीने पाडलं ग्रामपंचायतीला ‘भगदाड’

आमदारांचा थोडक्यात परिचय
जादब लाल नाथ, हे सीपीआयएम नेते होते मात्र त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नाथ यांनी 2018 ची निवडणूक सीपीआयएम उमेदवार आणि माजी स्पीकर रामेंद्र चंद्र देबनाथ यांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर लढवली होती, परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्रिपुराच्या उत्तरेकडील जिल्ह्यातील बागबाशा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

Exit mobile version