Gautami Patil : गौतमीने पाडलं ग्रामपंचायतीला ‘भगदाड’

Untitled Design   2023 03 30T195715.371

अहमदनगर : गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हंटले की हंगामा तर होणारच हे समीकरणच बनलं आहे. तिच्या कार्यक्रमात आजवर अनेकदा गोंधळ देखील झाला आहे. मात्र तिला पाहण्यासाठी आणि तिच्या अदाकारी टिपण्यासाठी गर्दी ही होतेच. अशीच गर्दी जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका गावात झाली. मात्र गौतमीचा हा कार्यक्रम ग्रामपंचायतीला मात्र महागात पडला आहे. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक ग्रामपंचायतीने बांधलेल्या गळ्याच्या पत्र्यावर चढले आणि पत्र्यांना भगदाड पडले. यामुळे गळ्यातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

पारनेर तालुक्यातील जवळे येथील बाजारतळावर प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नाच गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान सध्या गौतमी पाटील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिला पाहण्यासाठी तसेच तिच्या नृत्यातील अदाकारी पाहण्यासाठी जवळे पंचक्रोशितुन मोठ्या संख्येने तरुण व तिचे चाहते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी जवळा बाजारतळ पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे काही रसिक प्रेक्षक जागा उपलब्ध नसल्यामुळे आसपासच्या इमारती, मंदिरे व वेशीवर बसुन तिच्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंदत लुटत होते. कार्यक्रम ऐन जोमात आल्यावर काही अतिउत्साही युवक वेशी शेजारील ग्रामपंचायत जवळे यांनी बांधलेल्या दुकान गाळ्यावर चढले.

तरुण एवढ्यावरच न थांबता त्या गालावरील पत्र्यांवरच नाचू लागले. यामुळे गाळ्याच्या पत्र्याला मोठे भगदाड पडून एक युवक गाळ्यात खाली कोसळला. नंतर त्याला बाहेर काढण्यात आले. दरम्यान या घटनेत तो जखमी झाला. याच दरम्यान पत्र्याला भगदाड पडून तरुण खाली पडल्याने दुकानातील काही साहित्याची मोडतोड झाली आहे.

अजित पवारांना कोर्टाची भाषाच समजत नाही…फडणवीसांचा टोला

दुकानाच्या झालेल्या नुकसानी बाबत दुकानदाराच्या तक्रारीवर ग्रामपंचायत व कार्यक्रमाचे आयोजक यांनी मात्र गप्प बसून राहणे पसंत केले आहे. एवढं सगळं झालं मात्र या नुकसान भरपाईची दखल मात्र कोणी देखील घेतली नाही आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात नुसता घोषणांचा सुळसुळाट, मात्र पैसा कोठून आणणार?

दरम्यान दुकानदाराकडून आपल्या दुकानाच्या नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. सदर नुकसान भरपाई ग्रामपंचायत किंवा आयोजकांनी द्यावी याबाबतचा अर्ज देखील करण्यात आला आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्यामुळे दुकानदाराला मात्र विनाकारण गौतमीच्या अदांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे .

Tags

follow us