अजित पवारांना कोर्टाची भाषाच समजत नाही…फडणवीसांचा टोला

अजित पवारांना कोर्टाची भाषाच समजत नाही…फडणवीसांचा टोला

नागपूर : महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे. ते काहीही करत नाही म्हणूनच धार्मिक वाद विकोपाला जात आहे…या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. आता याच मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. काहींना न्यायालयीन कार्यवाहीच समजत नाही. न्यायालय काय म्हणते हे ज्यांना समजत नाही, त्यांना उत्तर देण्याची काही एक गरज नाही. अशा शब्दात फडणवीस यांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष सुनावलं आहे.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारला नपुंसक म्हटले असा कांगावा जे लोक करताहेत, त्यांची वक्तव्य न्यायालयीन कामकाजाच्या ज्ञानअभावातून आहेत.

राज्य सरकारने काय-काय कारवाई केली, हे सांगितल्यानंतर राज्य सरकारविरुद्ध अवमानना नोटीस किंवा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला नाही. याउलट इतर राज्यातही कोणकोणती वक्तव्ये केली जात आहेत आणि कसे महाराष्ट्राला पिनपॉईंट करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे सॉलिसिटर जनरल यांनी लक्षात आणून दिले.

मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास होणार; मुख्यमंत्र्यानी दिले आश्वासन

त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने एक सर्वसाधारण वक्तव्य केले की, सर्व राज्यांनीच कार्यवाही केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने कुठेही राज्य सरकारवर कोणतीही निर्णय दिला नाही, कोणतीही अवमानना कारवाई केली नसताना, जे राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत, त्यांना न्यायालयीन कार्यवाहीच समजत नाही. न्यायालय काय म्हणते हे ज्यांना समजत नाही, त्यांना उत्तर देण्याची काही एक गरज नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवार याना सुनावलं आहे.

Nana Patole : ‘राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा’

काहीजण परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करताहेत
छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी दोन गटात वाद झाले व त्यानंतर झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती चिघळू लागली. याच मुद्द्यावर बोलताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले संभाजीनगरला घडलेली घटना दुर्दैवी आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू काही नेते भडकावू वक्तव्य देऊन परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करताहेत. आपली शहरं शांत ठेवण्याचा प्रयत्न सर्वांना केला पाहिजे, असे आवाहन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आज मर्यादा पुरुषोत्तम श्री रामनवमी आहे. जे नेते राजकीय वक्तव्य देऊन तेथील परिस्थिती आणखी बिघडावी, असा प्रयत्न करताहेत, ते दुर्दैवी तर आहेच, पण त्यांची राजकीय बुद्धी किती छोटी असेल याचेही हे परिचायक आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube