मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास होणार; मुख्यमंत्र्यानी दिले आश्वासन

मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास होणार; मुख्यमंत्र्यानी दिले आश्वासन

मुंबई : मुंबादेवी (Mumbadevi) हे मुंबईतील प्राचीन मंदिर असून काळानुरुप या मंदिर परिसराचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. त्यानुसार या मंदिराला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी भेट देऊन मंदिर आणि सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. तसेच मुंबादेवी मंदिर डेव्हलपमेंट ऑथिरीटी प्राधीकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले.

काळबादेवी येथील मुंबादेवीचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ.दीपक सावंत, माजी मंत्री राज के पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित,अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासु आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबादेवी हे प्राचीन मंदिर असून याप्रती सर्वांनाच श्रध्दा,आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात. या मंदिर परिसराचा श्री काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन स्थित महाकाल मंदिर कॉरिडॉर, तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी मुंबईकरांची आहे.

राहुल गांधींवरील कारवाईवर जगभरातून प्रतिक्रिया, जर्मनीनेही केलं भाष्य ही तर लोकशाहीची…

या परिसरात अत्यावश्यक असणा-या सोयी सुविधा लक्षात घेवून त्या ठिकाणी दर्शन रांगा, पार्किंग व येथे आवश्यक असणा-या परिसराच्या विकासाबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दुर्दैवी घटना ! प्रवासी जहाजेला लागली आग, 12 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

दरम्यान रामनवमीच्या पवित्र दिनी मुंबईकरांची ग्रामदेवता अशी ओळख असलेल्या मुंबादेवी मंदिरात उपस्थित राहून श्री मुंबादेवी मातेचे आज मनोभावे दर्शन घेतले. हिंदुत्वाचे प्रतीक असलेला भगवा झेंडा मुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिराच्या विश्वस्तांना सुपूर्द केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube