दुर्दैवी घटना ! प्रवासी जहाजेला लागली आग, 12 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना ! प्रवासी जहाजेला लागली आग, 12 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व आशियाई देश फिलिपाइन्समध्ये (Phillipine) गुरुवारी एक दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. 250 लोकांना घेऊन जाणाऱ्या एका जहाजाला आग लागली असून या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहे. प्रशांत महासागरात ही घटना घडली आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशांत महासागरात घडलेल्या या अपघाताची माहिती फिलिपाइन्स कोस्ट गार्ड्सने (PCG) दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फिलिपाइन्स कोस्ट गार्ड्स (PCG) ने सांगितले की पॅसेंजर जहाज हे प्रशांत महासागरातून जात असताना एका बेटाजवळ जहाजेला भीषण आग लागली. या अपघातात 23 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुल गांधींवरील कारवाईवर जगभरातून प्रतिक्रिया, जर्मनीनेही केलं भाष्य ही तर लोकशाहीची…

या अपघाताबाबत गव्हर्नर जिम हॅटमन यांनी सांगितले की, ‘आगीमुळे झालेल्या गोंधळामुळे काही प्रवासी जागे झाले. आगीची घटना पाहताच काही प्रवाश्यांनी थेट पाण्यात उड्या मारल्या. अधिका-यांनी सांगितले की, काहींचा बुडून मृत्यू झाला आहे तर मृत्यू झालेल्यांपैकी बहुतेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Rahul Gandhi सोडणार निवासस्थान, खासदारांना बंगला सोडण्याचा अन् मिळण्याचा नियम काय?

तर जहाजेला आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणारे अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी अनेकांना तटरक्षक दल, नौदल, दुसरी बोट आणि स्थानिक मच्छिमारांनी समुद्रातून बाहेर काढले. त्याचबरोबर इतर अनेकांचा शोध सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं ‘हे’ आवाहन

विशेष म्हणजे या द्वीपसमूहात वारंवार येणारे वादळ, खराब देखभाल केलेल्या बोटी, जास्त गर्दी आणि सुरक्षितता नियमांना डावलणे अथवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे या गोष्टी नेहमी घडतात. दरम्यान दुर्गम राज्यांमध्ये सागरी अपघात सामान्य आहेत. डिसेंबर 1987 मध्ये, डोना पाझ ही नौका इंधनाच्या टँकरला आदळल्यानंतर या सागरी आपत्तीत 4,300 हून अधिक लोक मारले गेले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube