Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी धोक्यात?

Rahul Gandhi :  राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. पण सध्या त्यांची खासदारकी संकटात सापडली आहे. राहुल गांधी यांच्या माफी न मागण्याच्या भूमिकेवरुन भाजप त्यांच्या विरोधात चांगलाचा आक्रमक झालेला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसद, लोकशाही व संस्थांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यावरुन राहुल यांच्या विरुद्ध विशेष समिती नेमण्याची मागणी केलेली […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 17T113126.490

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 17T113126.490

Rahul Gandhi :  राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. पण सध्या त्यांची खासदारकी संकटात सापडली आहे. राहुल गांधी यांच्या माफी न मागण्याच्या भूमिकेवरुन भाजप त्यांच्या विरोधात चांगलाचा आक्रमक झालेला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसद, लोकशाही व संस्थांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यावरुन राहुल यांच्या विरुद्ध विशेष समिती नेमण्याची मागणी केलेली आहे.

राहुल गांधी यांची लोकसभेची सदस्यता संपूष्टात आणण्यासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात यावी, असे निशिकांत दुबेंनी म्हटले आहे. 2005 मध्ये देखील प्रश्नाच्या मोबदल्यात पैसे घेण्याच्या प्रकरणात विशेष समिती नेमण्यात आली होती, असे भाजपच्या या खासदाराने म्हटले आहे. या 11 सदस्यांच्या समितीने संसदेच्या सन्मानाला ठेच पोहोचवल्या प्रकरणी खासदाराची सदस्यता रद्द केली होती, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने देखील योग्य म्हटले होते.

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी

राहुल गांधी यांनी वारंवार युरोप व अमेरिकाला बोलवा असे आवाहन करुन भारताच्या संसदेचा अवमान केला आहे. तसेच देशाची गरिमा धुळीस मिळवली आहे. त्यामुळे आता त्यांची खासदारकी रद्द करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, या विषयावर गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसद भवनात आठ वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. यामध्ये पुढिल दिवसांत राहुल गांधींवर काय कारवाई करायची यावर चर्चा झाली आहे.

Pune-Mumbai द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, तिघांचा दुर्दैवी मृत्यू

याआधी राहुल गांधी यांनी परदेशातून आल्यावर एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी मला भाजपच्या आरोपांना उत्तर द्यायचे आहे पण मला संसदेमध्ये बोलू दिले जाणार नाही, असे ते म्हणाले होते. माझ्यावरील आरोप हे संसदेमध्ये चार मंत्र्यांकडून लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा माझा अधिकार आहे की, मला उत्तर देण्याची संधी मिळावी, असे ते म्हणाले आहेत.

Exit mobile version