Download App

मोठी बातमी! माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या; अन्यथा..विनोद तावडेंची काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांना नोटीस

या नोटीसमध्ये विनोद तावडे म्हणतात, माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या किंवा तुम्ही तिघ माफी मागा. त्याचबरोबर माफी न मागितल्यास

  • Written By: Last Updated:

Vinod Tawde Notice to Congress : विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. परंतु, उद्या मतदान होणार अशी परिस्थिती असताना भाजपचे ऱाष्ट्रीय सरचिटणीक विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याची गोष्ट समोर आली होती. त्यावर आता विनोद तावडे यांनी आपल्यावरील आरोप खोटे आहेत असं म्हणत आरोप केल्याने थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

ते चुकीचं आहे

या नोटीसमध्ये विनोद तावडे म्हणतात, माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या किंवा तुम्ही तिघ माफी मागा. त्याचबरोबर माफी न मागितल्यास तुम्हा तिघांविरूद्ध कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला जाईल. ही मानहानीची नोटीस 100 कोटी रुपयांची आहे असंही विनोद तावडे यामध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, मी 40 वर्षे राजकारणात असून आजपर्यंत माझ्यावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. मी आयुष्यभर साधेपणाने राजकारण केलं. ज्या घटनेबाबत माझ्यावर आरोप झाला ते चुकीचं आहे असंही ते म्हणाले आहेत.

मोठी बातमी! बच्चू कडूंना महायुती अन् मविआचाही फोन; नेमकं काय घडतंय?

खोटे आरोप करून माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, त्यामुळे त्या गोष्टींचे पुरावे द्या अन्यथा माफी मागा. आपण तसं न केल्यास 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला जाईल असंही विनोद तावडे आपल्या नोटीसमध्ये म्हणाले आहेत. त्यामुळे विनोद तावडे यांनी घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसकडून काय उत्तर मिळतय हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. कारण विनोद तावडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

18 नोव्हेंबर रोजी विनोद तावडे हे नालासोपारा विधानसभेच्या विरारमधील एका हॉटेलमध्ये बसले होते. दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर तेथे पोहोचले. तावडे हॉटेलमध्ये पैसे वाटून घेत असल्याचा आरोप ठाकूर आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे. यावेळी ठाकूर यांच्या समर्थकांनी तावडे यांना घेराव घातला. तसंच, त्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलं झाला.

follow us