Golden Temple : अमृतसर सुवर्ण मंदीर परिसरात पाच दिवसांत तिसरा स्फोट, पंजाब हादरले!

Blast in Golden Temple : पंजाबमधील अमृतसर या ठिकाणच्या सुवर्ण मंदीर परिसरामध्ये एका मागे एक अशा स्फोटाच्या घटना घडत आहेत. शनिवारी आणि सोमवारी तीस तासांत दोन स्फोट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा या मंदीर परिसरात तिसरा स्फोट झाला आहे. त्यामुळे पंजाब हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे. पंजाब हादरले! अमृतसर मंदिराजवळ 30 तासांमध्ये दुसरा बॉम्ब […]

golden temple

golden temple

Blast in Golden Temple : पंजाबमधील अमृतसर या ठिकाणच्या सुवर्ण मंदीर परिसरामध्ये एका मागे एक अशा स्फोटाच्या घटना घडत आहेत. शनिवारी आणि सोमवारी तीस तासांत दोन स्फोट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा या मंदीर परिसरात तिसरा स्फोट झाला आहे. त्यामुळे पंजाब हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे.

पंजाब हादरले! अमृतसर मंदिराजवळ 30 तासांमध्ये दुसरा बॉम्ब स्फोट

दरम्यान या अगोदर शनिवारी रात्री उशिरा झालेल्या स्फोटाची चौकशी सुरूच होती, की सोमवारी सकाळी 6.30 च्या सुमारास पुन्हा एकदा स्फोट झाला. तर यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती होती. सुमारे 30 तासांत दुसरा स्फोट झाल्याने लोकांमध्ये भिती पसरली आहे. पहिला स्फोट झाला तिथेच दुसरा स्फोटही झाला होता.

तर आता झालेला हा तिसरा स्फोट पहिल्या दोन स्फोटांच्या ठिकाणापासून 2 किलोमीटरवर झाला आहे. या घटनेती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. या घटनेचा तपास आता कसून सुरू असून अमृतसर सुवर्ण मंदीर परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

Exit mobile version