Download App

New Education Policy नुसार आता वर्षातून दोनदा होणार बोर्ड परिक्षा; शिक्षण मंत्रालयाची माहिती

Board Exam New Education Policy : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ( New Education Policy ) नुसार ठरवलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार आता वर्षातून दोनदा बोर्ड परिक्षा ( Board Exam ) घेण्यात येणार आहेत. केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने ही माहीती दिली आहे. आगामी 2024 च्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होणार आहे. दरम्यान केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने आज बुधवारी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार नवीन अभ्यासक्रम लॉन्च केला आहे.

Ravi Jadhav: रवी जाधव यांची हेमांगी कवीसाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘छोटेशी व्यक्तीरेखा…’

विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त स्कोर करण्यास स्कोप…

या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ( New Education Policy ) नुसार लागू करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्कोर करण्यास स्कोप असणार आहे. त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रमानुसार 11 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात दोन भाषा असणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर त्यातील एक भाषा ही भारतीय असणे देखील गरजेचे आहे. या नव्या अभ्यासक्रमामुळे त्याचबरोबर वर्षातून दोनदा बोर्ड परिक्षा ( Board Exam ) घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना ट्युशन आणि रट्टा मार अभ्यास करण्याची गरज देखील नसणार आहे. त्याएवजी त्यांची आकलन शक्ती वाढून त्यांना समजणे सोपे होईल.

आमदार अपात्र प्रकरण; विधानसभा अध्यक्षांकडे शिवसेनेच्या आमदारांचं लेखी उत्तर सादर…

नव्या अभ्यासक्रमात ( New Education Policy ) काय बदल होणार?
– वर्षातून दोनदा बोर्ड परिक्षा ( Board Exam ) घेण्यात येणार
– 11 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना दोन भाषा अनिवार्य
– 11 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना विषय निवडीत लवचिकता असणार
– वर्गात पाठ्यपुस्तकांवरच शिकवलं जावं हे बंधन नसणार
– वर्गात पाठ्यपुस्तकांच्या किंमतींवर विचार केला जाणार
– परिक्षा घेण्यासाठी बोर्ड मागणी करू शकतात.

यंदा सुरू झालेल्या शालेय शैक्षणिक वर्षापासून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षणामध्ये बदल होणार आहेत. त्याचे विद्यार्थी पालक आणि शाळांवर काय परिणाम होणार आहेत. हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना देखील माहित असणे गरजेचे आहे.

Tags

follow us