Gangsters Nicknames : बॉबी कबुतर, फहीम बम ते मजहर टोपी; गुंडांना हटके टोपण नावं कशी मिळतात?

Gangsters Nickname पोलिसांच्या विशेष पथकाने एका अशा गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. ज्याच्या नावाने गुन्हेगारी जगतातील अनेक गुपिते उलगडतील.

बॉबी कबुतर, फहीम बम ते मजहर टोपी; गुंडांना हटके टोपण नावं कशी मिळतात?

बॉबी कबुतर, फहीम बम ते मजहर टोपी; गुंडांना हटके टोपण नावं कशी मिळतात?

How Gangsters Get Interesting Nicknames : बॉबी कबुतर पकडला गेला नाव ऐकून थोडं विचित्र वाटलं ना? बॉबी कबुतर हे काय नाव झालं? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल पण, गुन्हेगारी जगातात टोपणनाव हे फक्त एक नाव नसते, तर ते ब्रँडिंगचे एक रूप असते. कधीकधी, ते खऱ्या नावापेक्षाही अधिक शक्तिशाली बनू शकते. गुन्हेगारी जगतातील गुंडाना ही हटके नावं कशी मिळतात. त्याचबद्दल जाणून घेऊया…

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अलीकडेच एका अशा गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. ज्याच्या नावाने गुन्हेगारी जगतातील अनेक गुपिते उलगडतील. मुसक्या आवळलेल्या या मोस्ट वॉटेंड गुंडाचं नाव महफूज उर्फ ​​”बॉबी कबुतर” असून तो, हाशिम बाबा आणि लॉरेन्स बिश्नोई टोळ्यांशी संबंधित आहे. महफूज उर्फ ​​”बॉबी कबुतर” ला अटक करणे ही केवळ पोलिसांची कारवाई नाही तर, खऱ्या नावांपेक्षा विचित्र पण प्रभावी टोपणनावांनी ओळख निर्माण करणाऱ्या अंडरवर्ल्डची झलक देखील आहे. बॉबी कबुतरचे नाव यापूर्वी अनेक गंभीर प्रकरणांमध्ये समोर आले आहे. चित्रपट अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत बॉबी वॉटेंड होता शिवाय, सूत्रांच्या मते, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या घराच्या रेकीमध्येदेखील बॉबी कबुतरचा सहभाग असल्याचे सांगितले जाते.

गुन्हेगारांसाठी नावापेक्षा ब्रँड जास्त महत्त्वाचा

गुन्हेगारी जगात टोपणनाव हे फक्त एक नाव नसते तर, ते ब्रँडिंगचे एक रूप असते. कधीकधी ते खऱ्या नावापेक्षाही अधिक शक्तिशाली बनते. त्यामुळे महफूज हे नाव फार कमी लोकांना लक्षात असेल पण, “बॉबी कबुतर” हे नाव लगेच लक्ष वेधून घेते आणि एक वेगळी ओळखदेखील निर्माण करते. गुन्हेगारांची ही टोपणनाव त्यांची वेगळी इमेज उभारण्याचे किंवा भिती निर्माण करू शकते. त्यामुळे कधीकधी गुंडांची ही हटके नावं इतकी लोकप्रिय होतात की, ती पोलीस रेकॉर्डमध्ये, मीडिया रिपोर्टमध्ये आणि अगदी दैनंदिन संभाषणात देखील वापरली जातात.

टोपण नावाला नसतात कोणतेच नियम

गुन्हेगारी जगतात वापरल्या जाणाऱ्या या टोपण नावांमागे काही ठोस नियमावली असते का तर, नाही. टोपणनावांच्या मागे कोणतेही नियम नाहीत, परंतु या नावांच्या निर्मितीमागे एक मनोरंजक प्रक्रिया नक्कीच आहे. बहुतेकदा ही नावे त्यांचे सहकारी, परिसरातील लोक किंवा कधीकधी पोलिसदेखील देतात. काही प्रकरणांमध्ये गुन्हेगार स्वतःला वेगळं दाखवण्यासाठी किंवा त्यांची खरी ओळख लपविण्यासाठी टोपण नावांची निवड करतात. हटके नाव निवडताना संबंधित व्यक्तीचे वर्तन, त्याची बोलण्याची पद्धत किंवा गुन्हे करण्याची शैली या गोष्टी लक्षात घेत ठेवली जातात. जर एखादा गुन्हेगार कमी कालावधीत गुन्हा करून घटनास्थळावरून पोबारा करत असेल तर, त्याला ‘कबूतर’ असे नाव मिळू शकते. त्याचप्रमाणे, जर एखाद्याला खतरनाक गुंड मानले गेले असेल तर, त्याला ‘कालिया’ किंवा ‘सुलतान’ अशी नावं दिली जाऊ शकतात.

भीती आणि दबदबा निर्माण करण्याची पद्धत

गुन्हेगारी जगतात काही टोपणनावे ही जाणूनबुजून भीती निर्माण करण्यासाठी निवडली जातात, जसे की कालिया, सुलतान, डॉन किंवा शेरू. ही नावे ऐकून सामान्यांच्या डोळ्यासमोर एक शक्तिशाली आणि खतरनाक चेहरा उभा राहतो. त्याशिवाय गुन्हेगार अनेकदा स्वतःची टोपणनावे निवडतात यामागे दोन मुख्य कारण असतात एक तर, स्वतःला वेगळे करणे आणि धोकादायक प्रतिमा निर्माण करणे आणि दुसरे, स्वतःचे खरे नाव लपविणे. जेव्हा एखादा गुन्हेगार “बॉबी कबुतर” सारख्या नावाने ओळखला जातो तेव्हा त्याची खरी ओळख शोधणे कठीण असते. ही युक्ती त्यांना पोलिसांपासून वाचण्यास देखील मदत करते, कारण अनेकदा गुन्हेगार वेगवेगळी नावे वापरतात.

हे झालं टोपण नाव ठेवण्यामागचं गणित आता गुन्हेगारी जगतातील काही अशीच हटके नावं आहेत जी क्राईम जगतापासून ते वर्तमानपत्रांच्या हेडलाईपर्यंत गाजली. यात प्रेम प्रकाश सिंह उर्फ ​​मुन्ना बजरंगी, हरनाम सिंह उर्फ हाजी मस्तान, सईद उर्फ ​​सईद अलंगा, फहीम खान उर्फ फहीम बम. यातील फहीमकडे बॉम्ब बनवण्याचे कौशल्य होते. त्याला जेव्हा जेव्हा पोलिसांनी पकडले तेव्हा तेव्हा त्याच्याकडे स्फोटके आढळू आली त्यानंतर त्याचे फहीम बम असे टोपण नाव पडले. यानंतर पुढचं नाव आहे ते मजहर उर्फ मजहर टोपी मजहरला हे नाव त्याच्या असलेल्या सवयीमुळे पडल्याचे सांगितले जाते. मजहर जेव्हा जेव्हा सट्ट्यामध्ये पैसे हरायचा तेव्हा समोरच्या व्यक्तीला हुशारीने पैसे देण्यासाठी पटवत असे आणि नंतर गायब होत होता. भोपाळी भाषेत याला टोपी घालणे असे म्हणतात. मजहरच्या याच सवयीमुळे त्याचे नाव मजहर टोपी असे पडले. याशिवाय गुन्हेगारी जगतात अरुण गवळी हे नाव आपल्यापैकी सर्वांनाच माहिती असून, गवळीला डॅडी या टोपण नावाने ओळखले जाते.

Disclaimer : वरील माहिती फक्त सामान्य माहितीवर आधारित असून, लेट्सअप मराठी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला किंवा त्यासंबंधित टोपण नावांना प्रोत्साहन देत नाही.

Exit mobile version